NISAKA Protest : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर होऊ घातलेल्या ड्रायपोर्टसाठीच्या जमीन विक्रीतून उपलब्ध होणाऱ्या रक्कम रुपये १०८ कोटींमधून कामगारांची थकीत ८१ कोटी देणी अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने किमान ५० टक्के रक्कम द्यावी, यासाठी कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले.
हे उपोषण जिल्हा बँकेविरुद्ध असून, कारखाना चालविणाऱ्या बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नाही, असे कामगार संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी (ता. २६) सुरू झालेले कामगारांचे साखळी उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच असून, याबाबत मध्यस्थीचा कोणताही तोडगा निघाला नाही. (protest of Nisaka workers against Nashik District Bank news)
कामगारांनी कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध कोणताही संप केलेला नसून, उलट कामगारांच्या वेतनाच्या मागणीनंतर दोन पगार अदा करून कारखाना प्रशासनानेच कारखाना प्रवेशद्वाराला कुलूप लावून त्यांना कामावर येण्यास प्रतिबंध केला आहे. याबाबत कोणताही कार्यालयीन आदेश न काढता कामगारांची फसवणूक केली आहे.
अशी वस्तुस्थिती असताना कामगारांबाबत अपप्रचार करून त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप निसाका कामगार संघटनेतर्फे करण्यात आला आहे. कामगारांचे वेतन व सेवाशर्ती निश्चित करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन व नाशिक जिल्हा बँकेने कामगारांशी त्रिपक्षीय करार करावा, अशी मागणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. २७) नाशिक साखर कारखाना कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष विष्णुपंत गायके, नामदेव बोराडे, रामदास टिळे, मनसे नाशिक तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, मनसे रोजगार व स्वयंरोजगार समितीचे जिल्हाध्यक्ष तुषार गांगुर्डे, दादा शेलार, पिंपळस रामाचे येथील सरपंच निशा ताजणे, उपसरपंच अरुण डांगळे, माजी सरपंच तानाजीराव पूरकर, सदस्य नितीन मत्सागर, नंदू मत्सागर, प्रमोद मत्सागर, माधव घायटे यांनी पाठिंबा व्यक्त केला. जिल्हा बँकेकडून पैशांचे योग्य वाटप होण्यासाठी कामगार संघटनेने तातडीने कोर्टात कॅव्हेट दाखल करून कामगारांच्या संमतीशिवाय पैशांचे वाटप करू नये, असा मनाई हुकूम आणावा, असे गायके यांनी या वेळी सांगितले.
या वेळी झालेल्या सभेत कामगार संघटना पदाधिकारी व कामगारांनी रास्ता रोको, तहसील कार्यालय, जिल्हा बँक नाशिक कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.