Nashik News : नाशिक क्षेत्रातातील 28,660 कंपन्यांना भविष्य निधी कायदा 1952 लागू

नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयांतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर पाच जिल्ह्यातील २८ हजार ६६० कंपन्यांना (आस्थापनांना) भविष्य निधी कायदा १९५२ लागू करण्यात आला आहे.
fund
fundesakal
Updated on

Nashik News : नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयांतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर पाच जिल्ह्यातील २८ हजार ६६० कंपन्यांना (आस्थापनांना) भविष्य निधी कायदा १९५२ लागू करण्यात आला आहे.

त्यामधील कार्यरत २३ लाख ४५ हजार९९२ सभासदांना भविष्य निधी कायद्यांतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, पेन्शन योजना व विमा योजनांमधील सुविधांचा लाभ लागू झाला आहे, असे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. (Provident fund to 28660 companies in Nashik area nashik news)

आयुक्त प्रीतम यांनी सांगितले, की ५ लाख २१ हजार २७४ एवढे सभासद नियमित भविष्य निर्वाह निधी भरत आहे. नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयात एकूण कर्मचारी निवृत्तिवेतन धारक एक लाख ६९ हजार १६६ इतके आहेत. नाशिक कार्यालय हे भारतातील सर्वात जास्त पेन्शनधारक असलेले भारतातील दोन नंबरचे कार्यालय आहे. सर्व पेन्शनधारक नियमित पेन्शन घेत आहेत. मागील वर्षी ३ लाख ३२ हजार ८५५ दावे २० दिवसाच्या आत निकाली काढण्यात आले.

त्याचे सरासरी प्रमाण ९८ टक्के आहे. त्याद्वारे एकूण रक्कम रुपये ७२७०९.२८ लाख रुपये सभासदांना देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ९९ टक्के दावे हे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले होते व ते सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच मागील वर्षात मृत पावलेल्या सभासदाचे एकूण १ हजार ३३ विमा दावे निकाली काढण्यात आले असून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास १७१७.१७ लाख रुपये देण्यात आले आहेत.

fund
Nashik News : बोगस मुख्याध्यापकांची शिक्षक मान्यता रद्द! सरस्वती एज्युकेशन सोसायटीतील प्रकार

मागील वर्षात २३१ कंपन्यांवर ७ अ, ५९१ कंपन्यांवर १४ ब आणि ७ क अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ४९९ कंपन्यांकडून २२०१.२६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच थकबाकीची रक्कम थकबाकीदार कंपन्यांकडून ११७८.७४ लाख वसूल करण्यात आले. कारवाईत २३१ कंपन्यांचे बँक अकाउंट सील करण्यात आले आहे.

नाशिक विभागात २६६८ नवीन कंपन्यांची नोंदणी

नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयात एकूण २६६८ नवीन कंपन्यांनी मागील वर्षात नोंदणी केली आहे. भविष्य निधी कायदा लागू करून घेतला आहे. भविष्य निधी कायद्यांतर्गत सर्व दावे आता ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सक्ती करण्यात आली आहे.

त्यासाठी सर्व सभासदाने इ- नॉमिनेशन करणे आवश्यक आहे. आजपर्यंत १ लाख ९३ हजार ६२७ (७८.१६ टक्के) सभासदांनी इ- नॉमिनेशन पूर्ण केलेले असून ज्या सभासदाने केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे, असे आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी सांगितले.

fund
Nashik News : मतदारांची 20 हजार दुबार नावे वगळली; मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()