PSI Convocation Ceremony: महाराष्ट्र पोलिस अकादमीत उद्या 122 व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा

PSI Convocation Ceremony
PSI Convocation Ceremonyesakal
Updated on

PSI Convocation Ceremony : त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२२ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (ता. ५) होत आहे.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. सकाळी आठला महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये हा सोहळा होईल. (PSI Convocation ceremony of 122nd batch tomorrow at Maharashtra Police Academy nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PSI Convocation Ceremony
Nashik News: ‘ओतूर’प्रकल्पाच्या आशा पल्लवीत! आमदार नितीन पवारांचा पाठपुरावा

सरळसेवेने पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवडल्या गेलेल्या ४९४ उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यात ३४९ पुरुष आणि १४५ महिला प्रशिक्षणार्थी आहेत. संचलनानंतर अकादमीचे संचालक प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना शपथ देतील.

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अकादमी कॉम्प्लेक्स, मोटर परिवहन विभाग इमारत, अकादमी मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंतीचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल.

पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे महासंचालक संदीप बिश्नोई उपस्थित राहतील.

PSI Convocation Ceremony
Adhik Maas: अधिक-श्रावण आर्थिक उन्नतीचा ऊर्जास्रोत! त्र्यंबकनगरी भाविकांच्या वर्दळीनं रात्रं-दिन जातेय फुलून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.