PSI Physical Exam Date : पीएसआयची शारीरिक चाचणी नोव्‍हेंबरमध्ये; असे असेल चाचणीचे स्‍वरूप

PSI physical test in November nashik news
PSI physical test in November nashik newsesakal
Updated on

PSI Physical Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठी अखेर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

नोव्‍हेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात ही चाचणी होणार असून, पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्‍ध करून दिली जाईल. कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झाले होते. (PSI physical test in November nashik news)

त्‍यामुळे अद्यापही अनेक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यापैकीच २०२१ च्‍या काही परीक्षांचाही समावेश आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.

त्‍यानंतरपासून उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, उमेदवारांना चाचणीला सामोरे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार ही चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार होती.

PSI physical test in November nashik news
PSI Success Story : `कमवा व शिका` योजनेततून 'अमृता' शिकली अन् घातली खाकी वर्दीला गवसणी !

डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे ही चाचणी घेण्यात येणार होती; परंतु काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध केली असून, त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद केलेली आहे.

शारीरिक चाचणीचे असे असेल स्‍वरूप...

पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे; तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्‍या आधारे गुणांकन केले जाणार आहे. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाईल.

PSI physical test in November nashik news
PSI Success Story: कष्टाचे चीझ करत चषकावर मोहर! पोलिस दीक्षांत संचलनात उमराणेच्या ‘किरण’ला 3 पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.