PSI Success Story: शेतकऱ्याची लेक उमा पहिल्याच प्रयत्नांत बनली पोलिस उपनिरीक्षक!

Dr. Arogya Ratna while felicitating Uma Kotme and her parents who were selected as Police Sub-Inspector of Kotamgaon. Suresh Kamble, former Speaker Praveen Gaikwad.
Dr. Arogya Ratna while felicitating Uma Kotme and her parents who were selected as Police Sub-Inspector of Kotamgaon. Suresh Kamble, former Speaker Praveen Gaikwad.esakal
Updated on

PSI Success Story : ध्येय, इच्छाशक्ती अन प्रबळ आत्मविश्वास असला की कुठलीही परिस्थिती आड येत नाही हे कोटमगाव विठ्ठलाचे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लेक उमा कोटमे हिने दाखवून दिले आहे.

खडतर परिस्थितीतही शिक्षणाचा प्रवास खंड पडू न देता तिने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. यानिमित्त तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (PSI Success Story Farmer daughter Uma kotame Becomes Police Sub Inspector in First Attempt nashik)

राजेंद्र कोटमे यांची उमा ही लेक... काबाडकष्ट करून,आई-वडिलांना रात्रंदिवस शेतीत मदत करूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती एमपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

तिने महाराष्ट्रामध्ये मुलाखतीत दुसरा क्रमांक घेऊन सर्वात जास्त ३१ गुण मिळवले आहे. तिने शहरातील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयातून बीएससीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे ९० टक्के गुण मिळवून ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, मात्र पुढे पदव्युत्तर किंवा इतर शिक्षण न करता एमपीएससी करण्याचा तिने निर्णय घेतला आणि तो सार्थ ठरवला आहे.

आई-वडिलांचे आपल्या यशात सर्वस्वी योगदान असल्याचे ती सांगते. येवल्यातील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत रोज पाच किलोमीटरवरून ती अभ्यासाला यायची.

तिला सोडवायला आणि घ्यायला रोज वडील न विसरता यायचे. कुठलाही सण, उत्सव, कार्यक्रम साजरा न करता सतत दोन वर्षे पूर्ण अभ्यास केला, त्याचे हे फळ मिळाल्याचे उमा आवर्जून सांगते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Arogya Ratna while felicitating Uma Kotme and her parents who were selected as Police Sub-Inspector of Kotamgaon. Suresh Kamble, former Speaker Praveen Gaikwad.
PSI Success Story: पितृ छत्र हरपलेल्या मनिषा चव्हाणची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

वैद्यकरत्न पुरस्कार विजेते डॉ. सुरेश कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी तिच्या घरी जात सत्कार केला. उमासह तिचे वडील राजेंद्र कोटमे व आई लंकाबाई राजेंद्र कोटमे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

ध्येय डोळ्यापुढे ठेवून ग्रामीण भागातील मुले आज पुढे जात आहेत. स्पर्धा परीक्षांसह डॉक्टर, इंजिनिअर होऊन नाव कमवत भरारी घेत असल्याचे उद्गार यावेळी डॉ. कांबळे तसेच श्री. गायकवाड यांनी काढले.

"प्रचंड मेहनत घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील मुले यशाला गवसणी घालत आहेत. परिस्थिती चांगली असलेले विद्यार्थी मुंबई, पुणे, दिल्ली येथे अभ्यासाला जातात परंतु उमाने घरीच अभ्यास करून आपले ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घातल्याने तिचे यश कौतुकास्पद आहे."- डॉ. सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, येवला.

Dr. Arogya Ratna while felicitating Uma Kotme and her parents who were selected as Police Sub-Inspector of Kotamgaon. Suresh Kamble, former Speaker Praveen Gaikwad.
Success Story: डुबेरेतील शेतकरी कन्या वर्षाचा लंडनमध्ये MS पदवीने सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.