PSI Success Story: पितृ छत्र हरपलेल्या मनिषा चव्हाणची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Students and villagers of Commando Defense Career Academy felicitating Manisha Chavan, who was selected as Police Sub-Inspector in Vaibothi (Yewla).
Students and villagers of Commando Defense Career Academy felicitating Manisha Chavan, who was selected as Police Sub-Inspector in Vaibothi (Yewla).esakal
Updated on

PSI Success Story : वाईबोथी( ता. येवला) या छोट्याशा खेडेगावातील गरीब व शेतकरी कुटुंबातील मनीषा संजय चव्हाण हिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. इयत्ता बारावीत शिक्षण घेत असतानाच मनीषाचे पितृछत्र हरपले.

खडतर व संघर्षमय काळात आई शीलाबाई चव्हाण व पोलिसदलात कार्यरत असलेली बहीण अर्चना यांनी खंबीर साथ देऊन मनीषाला प्रोत्साहन दिले. (PSI Success Story Manisha Chavan who lost her father passed MPSC at post of police sub inspector nashik)

तिने शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत देशपातळीवर दिल्ली येथे स्पर्धेत उत्तम यश मिळवले. दरम्यान मनीषा पोलिसदलात भरती झाली. जिद्द व मेहनतीच्या जोरावर मनीषा आज वाईबोथी व पंचक्रोशीतील पहिली महिला उपनिरीक्षकपदाचा बहुमान विजेती ठरली आहे.

दिवंगत वडील व कुटुंबीयांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे मनोगत मनीषाने व्यक्त केले. वाईबोथी ग्रामस्थांच्या वतीने मनीषा चव्हाण यांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students and villagers of Commando Defense Career Academy felicitating Manisha Chavan, who was selected as Police Sub-Inspector in Vaibothi (Yewla).
PSI Success Story : दूध विक्रेत्याचा मुलगा झाला पीएसआय! परिसरात मिरवणूक, भव्य सत्कार

या वेळी युवानेते गोरखआबा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुनील पैठणकर, पारेगावच्या सरपंच ज्योती गायकवाड, स्वामी मुक्तानंद कॉलेजचे प्राध्यापक सोनवणे, कमांडो डिफेन्स करिअर ॲकॅडमीचे संचालक मेजर अनिल वरे, माजी सैनिक सुरेश धनवटे, कोळगावचे सरपंच संदीप गायकवाड, पोलिसपाटील दत्तात्रय आहेर,

संत नारायणगिरीजी महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण, रामकृष्ण डोंगरे, नामदेव चव्हाण, दौलत आहेर, उत्तम चव्हाण, बाळनाथ चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल आहेर, ग्रामपंचायत सदस्य किशोर आहेर, संतोष अगवन, नवनाथ मोरे, नंदू आहेर, दिलीप आहेर, किरण आहेर, पुंडलिक आहेर, सुदाम खजुरे आदींसह ग्रामस्थ व डिफेन्स करिअर अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Students and villagers of Commando Defense Career Academy felicitating Manisha Chavan, who was selected as Police Sub-Inspector in Vaibothi (Yewla).
PSI Success Story : `कमवा व शिका` योजनेततून 'अमृता' शिकली अन् घातली खाकी वर्दीला गवसणी !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.