PSI Success Story : गंगाधरीतील मेंढपाळाच्या मुलाची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Rushikesh Karnar
Rushikesh Karnaresakal
Updated on

PSI Success Story : संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्‍वास या सर्वांच्या जोरावर गंगाधरी (ता. नांदगाव) येथील मेंढपाळांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई,वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ऋषीकेश वाल्मीक कर्नर असे या मुलाचे नाव आहे. (PSI Success Story Son of shepherd from Gangadhri rose to post of police sub inspector nashik)

नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या गंगाधरी येथील तळेवस्ती येथे राहणाऱ्या ऋषीकेश कर्नर याने वस्तीशाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर नांदगाव येथून माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

या दरम्यान तो आई, वडिलांना शेतीचे कामे मेंढपाळ असल्याने वाड्यावरील कामातही तो मदत करत असे. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेताना त्याने कुठलीही शिकवणी लावली नाही.

त्यानंतर त्याने फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. यासाठी त्याने छत्रपती संभाजीनगरला जाऊन अभ्यास केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rushikesh Karnar
PSI Success Story : प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कटलरी व्यावसायिकाचा मुलगा बनला ‘पीएसआय’

तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आलात हे महत्त्वाचे नसते तर आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत उपलब्ध साधनाचा उपयोग करून जीवनात यश मिळविता येते.

माझ्याकडे हे नाही ते नाही असे न म्हणता फक्त मेहनतीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते याचा प्रत्यय ऋषीकेशने आणून देत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. यासाठी त्याला आजोबा त्र्यंबक कर्नर , वडील वाल्मीक कर्नर, आई, आजी, शिक्षक या सर्वांचे पाठबळ मिळाले.

Rushikesh Karnar
PSI Success: तब्बल 21 वेळा स्पर्धा परीक्षा देऊनही मानली नाही हार! इंजिनिअर शेतकरी सत्वपरिक्षा देऊन झाला फौजदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.