नाशिक : धर्मशास्त्राच्या दृष्टीने सूर्यग्रहण काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असतो. याअनुषंगाने मंगळवारी (ता.२५) सूर्यग्रहण असल्याने, दुपारनंतर रामकुंडावर भाविकांची गर्दी बघायला मिळाली. ग्रहण काळात जप- तप करताना यानंतर भाविकांकडून गोदावरी पात्रात अंघोळ करण्यात आली. (puja bath in Godapatra by Devotees crowd at Ramkunda for solar eclipse 2022 Nashik News)
खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळात स्पर्श सायंकाळी चार वाजून ४९ मिनीटांनी होता. तर मोक्ष वेळ सायंकाळी सहा वाजून ८ मिनीटे अशी होती. अशा ग्रहणाच्या एक तास १९ मिनिटांच्या काळासाठी ग्रहणाचा दोष टाळण्यासाठी भाविकांनी जप-तप, पूजेचा आधार घेतला. रामकुंड व परिसरात मंगळवारी दुपारपासून भाविकांची वर्दळ बघायला मिळाली. रामकुंडालगतच्या जिन्यावर बसून अनेक भाविकांकडून जप सुरु होता.
तर काहींनी कुंडात उभे ठाकत जप सुरु केला. रुद्राक्षाची माळ घातलेले साधू-पुजार्यांसह सर्वसामान्य भाविकांची यावेळी उपस्थिती होती. भाविकांमध्ये महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग राहिला. ग्रहणकाळ संपल्यानंतर उपस्थित भाविकांनी रामकुंड पात्रात अंघोळ करताना मांगल्याची प्रार्थना केली. तर काही भाविकांनी घर बसल्या जप करताना ग्रहण काळातील संहितेचे पालन केले. विशेषतः गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक महिला, चिमुकल्यांनी या काळात सावधगिरीच्या विविध उपाययोजना केल्याचे बघायला मिळाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.