Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणानंतर महसूल विभागात शोध मोहीम; बोगसगिरी करणाऱ्यांची आता गय नाही

Puja Khedkar parents divorce centre asks pune police about their marital status
Puja Khedkar parents divorce centre asks pune police about their marital status
Updated on

नाशिक : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर व सोलापूरचे तहसीलदार बाळू मरकड यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळल्यानंतर आता जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. महसूल सेवेतील सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या ४६ शिक्षकांसह विविध संवर्गातील ५९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळले आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी सुरु असतानाच राज्यात पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राने एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे बनावट प्रमाणपत्राआधारे शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीची मागणी प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी समाजकल्याण आयुक्तांकडे केली.

Puja Khedkar parents divorce centre asks pune police about their marital status
Nashik Manoj Jarange Patil Rally : तब्येत खालावली, तरी सोडले नाही मैदान; मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीत तीनवेळा चमक

राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याची मागणीही केली आहे. आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना पत्र पाठवून दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविल्याचे समजते. यावरून नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागात कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने मागविली आहे.

दरम्यान, पूजा खेडकर हीचं आयएएस पद यूपीएससीने रद्द केलं आहे. त्यापूर्वी तिच्यावर नाव बदलून अनेकवेळा परीक्षा दिल्या म्हणून गुन्हा दाखल झाला होता. पूजा खेडकरने दोन ते तीन बोगस अपंग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे. याशिवाय तिने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोट्यवधींची संपत्ती लपवून ठेवली. या सगळ्या प्रकरणामुळे तिच्यावर कारवाई झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.