Nashik News : रावळगाव कारखान्यात साखर पोत्यांचे पूजन; अडचणींवर मात करत साखरेचे उत्पादन

रावळगाव (ता. मालेगाव) येथील एस. जे. शुगर साखर कारखान्यात एक लाख ५१ हजार साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.
S. J. Women sisters worshiping sugar sacks in a sugar factory
S. J. Women sisters worshiping sugar sacks in a sugar factoryesakal
Updated on

Nashik News : रावळगाव (ता. मालेगाव) येथील एस. जे. शुगर साखर कारखान्यात एक लाख ५१ हजार साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

ऊस उत्पादक यशोदाबाई चव्हाण, शकुंतला मेधने, शेणपुरेच्या सरपंच सपना काकुस्ते, जिजाबाई काळे, दाभाडीच्या माजी सरपंच भावना निकम, मीना दाणी, अर्चना पवार, दाभाडीच्या सरपंच वनमाला निकम, जयश्री पवार, श्रीमती माने, रंजना झा, वंदना देवरे, वंदना गायकवाड, सुनीता गुरगुळे, कविता टिळेकर, सविता म्हेत्रे, वंदना चव्हाण, नूपुर गायकवाड, दत्तांजली दहिभाते, वर्षा कोऱ्हाळकर, अश्विनी जाधव, रूपाली पाटील आदींच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. (Puja of sugar sack in Ravalgaon factory nashik news )

देशातील खासगी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना म्हणून रावळगावची ओळख आहे. गेल्या तीन वर्षापासून कारखाना बंद होता. अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखाना सुरु केला. अनेक अडचणींवर मात करत कारखाना यशस्वीपणे साखरेचे उत्पादन घेत आहे.

यावेळी भावना निकम म्हणाल्या की, माझे गाव साखर कारखाना परीसरातील आहे. रावळगाव कारखान्याचे वैभव लयाला गेले होते. परंतु अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी पुण्यावरून येवून रावळगाव कारखाना सुरु करून परिसरात नवचैतन्य पसरविले. गावाचा विकास, बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळाले. रोजगार निर्मिती झालेली पाहून आनंद झाला. परीसरातील उलाढाल वाढली.

उसाच्या ट्रक कारखान्यावर जाताना पाहून सर्वांनाच आनंद होत आहे. हा आनंद टिकवण्यासाठी आम्ही सर्वेतोपरी सहकार्य करू. कारखान्यास काही अडचण आली तर आम्ही रणरागिणी त्या संकटापुढे उभ्या राहून कारखाना चालु ठेवण्यास सहकार्य करू असे त्यांनी सांगितले. वनमाला निकम यांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत शेतकरी बांधवांना ऊस लागवड करण्याचे आवाहन केले.

S. J. Women sisters worshiping sugar sacks in a sugar factory
Nashik News : शेतकरी, कष्टकर्यांसाठी गोळी मारली असती तर केलं असतं स्वागत : आ. बच्चू कडू

संचालक कुंदन चव्हाण यांनी प्रास्ताविक करत अध्यक्ष व संचालक मंडळाने गावोगावी फिरून शेतकऱ्यांशी संपर्क साधला. या भागातील अडचणी समजून घेतल्या. कारखाना सुरु होण्यात संचालक मंडळ, ऊस उत्पादक, कामगार, अधिकारी आदी सर्वच घटकांचा सहभाग आहे.

शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला भगिनींनी गाळप सुरु असताना कारखान्यास अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. उपाध्यक्ष नानासाहेब आंबेकर यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

''ऊस तोडणी कामगारांसह अनेक अडचणींचा सामना करत कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरु आहे. कसमादेसह परिसरातील शक्य तेवढा ऊस हंगामात गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. भविष्यात डिस्टलरी, इथेनॉल, सीएनजी तसेच इतर बायप्रोडक्टस करण्याचा मानस आहे.''- बबनराव गायकवाड, अध्यक्ष, एस. जे. शुगर रावळगाव

S. J. Women sisters worshiping sugar sacks in a sugar factory
Nashik News : 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.