नाशिक : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला असून, या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सांघिक प्रकारात पुणे शहर व पिंपरी चिंचवड, अमरावती परिक्षेत्र व नागपूर परिक्षेत्र या संघांनी विजयी सलामी दिली.
तर वैयक्तिक क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपआपल्या क्रीडा प्रकारात नैपूण्य मिळविले.
दरम्यान, स्पर्धेचे आयोजक नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पर्धेतील खेळाडूंची व्यक्तिशा भेट घेत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (Pune Chinchwad Amravati Nagpur victory salute 34th State Police Sports Tournament kicks off with bang nashik news)
त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या १९ मैदानांवर आजपासून राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विविध स्पर्धांची नाणेफेक करण्यात आली.
यावेळी उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपसंचालक सचिन गोरे, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुरुषांच्या फुटबॉलमध्ये पुणे शहर-पिंपरी चिंचवड संघाने नागपूर शहराचा २-१ ने पराभव केला. तर, अमरावती परिक्षेत्राने नवी मुंबई-मीरा भाईंदर व कोकण परिक्षेत्राचा ३-० ने पराभव केला.
नागपूर परिक्षेत्राने मुंबई शहर संघावर ४-२ ने विजय मिळविला. तर, नाशिक परिक्षेत्राला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
त्याचप्रमाणे, पुरुषांच्या हॅण्डबॉलमध्ये ठाणे शहराने रेल्वेचा तर, नागपूर शहराने कोकण परिक्षेत्राला पराभूत केले. पुणे-पिंपरी चिंचवड शहराने संभाजीनगरला नमविले तर, एसआरपीएफने अमरावती परिक्षेत्रावर विजय नोंदविला.
महिलांच्या खो-खोमध्ये नागपूर परिक्षेत्राने नागपूर शहरला पराभूत केले तर नांदेड परिक्षेत्राने अमरावती परिक्षेत्रावर विजय नोंदविला. ठाणे शहराने रेल्वे परिक्षेत्राचा आणि पुणे शहराने नाशिक परिक्षेत्राला पराभूत केले.
वेटलिफ्टिंग (पुरुष)
- ५५ कि. गट : अभिजित अवघडे (एसआरपीएफ) - प्रथम, संतोष सुतार (मुंबई शहर)-दिवतीय, तेजस भोसले (कोल्हापूर परिक्षेत्र) - तृतीय.
- ६१ कि.गट : रितेश यादव (कोकण परिक्षेत्र)- प्रथम, रोहित पाटील (प्रशिक्षण संचालनालय) - द्वितीय, खलिल शेख (एसआरपीएफ) तृतीय
- ६७ कि.गट : निलेश जाधव (नांदेड परिक्षेत्र) - प्रथम, मनोज राजपूत (मुंबई शहर) - दिवतीय, योगेश चौधरी (एसआरपीएफ)- तृतीय
वेटलिफ्टिंग (महिला)
- ५१ कि. गट : गणिता चव्हाण (मुंबई शहर) - प्रथम, प्रियंका म्हात्रे (प्रशिक्षण संचालनालय) - द्वितीय, भाग्यश्री कापडणीस (नाशिक परिक्षेत्र) - तृतीय
- ६१ कि. गट : करिना सुरसे ( प्रशिक्षण संचालनालय) - प्रथम, समिना पटेल (कोकण परिक्षेत्र) - द्वितीय, पूजा भाटकर (अमरावती परिक्षेत्र) - तृतीय
- ६७ कि. गट: अमृता चाकरे (नागपूर परिक्षेत्र)-प्रथम, जागृती काळे (नाशिक परिक्षेत्र) - द्वितीय, नेहा पवार (प्रशिक्षण संचालनालय) - तृतीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.