पुणे विद्यापीठ पदवीधर नोंदणी, मतदार यादीत नावनोंदणीस सुरवात

Pune University
Pune Universityesakal
Updated on

नाशिक : अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्‍याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर निवडले जाणार आहेत. त्‍यासाठी विद्यापीठाच्‍या पदवीधरांकडून (Graduates) नोंदणीकृत पदवीधर म्‍हणून नाव नोंदणीसाठी तसेच मतदार यादी (Voters List) तयार करण्याच्‍या प्रक्रियेला बुधवार (ता.१५) पासून सुरवात झालेली आहे. पात्र व्‍यक्‍तींना ४ जुलैपर्यंत नोंदणी प्रक्रिया राबविता येणार आहे. संकेतस्‍थळावर ऑनलाइन अर्ज (Website online Application) भरून व आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करत ही प्रक्रिया राबविता येईल. (Pune University Graduate Registration Voter List Registration Begins Nashik News)

पात्र व्‍यक्‍तींना विद्यापीठाच्‍या election.unipune.ac.in या संकेतस्‍थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. ही प्रक्रिया बुधवार (ता.१५) पासून सुरु झाली असून, ४ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. पुणे विद्यापीठाचे पदवीधर तसेच पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वास्‍तव्‍यास असलेल्या व पुणे विद्यापीठाची स्‍थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्‍या व्‍यक्‍ती विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्‍हणून नाव नोंदविण्यास पात्र असतील. अशा व्‍यक्‍तींना सोबत कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. विद्यापीठाचा नोंदणीकृत पदवीधर म्‍हणून नव्‍याने नाव नोंदवायचे असल्‍यास संबंधित व्‍यक्‍तीने पुणे विद्यापीठाच्‍या election.unipune.ac.in या लिंकमार्फत ऑनलाइन पद्धतीने माहिती भरायची आहे. व वीस रुपये नोंदणी शुल्‍क ऑनलाइन पेमेंटद्वारे अदा करायचे आहे. अर्जासोबत स्‍वतः साक्षांकित केलेली दस्‍तऐवजांची प्रत संकेतस्‍थळावर अपलोड करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये पदवी प्रमाणपत्र, निवासाचा पुरावा यासह अन्‍य कागदपत्रांचा समावेश असेल.

Pune University
1 हजार वाहनांवर GPS प्रणाली; नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

मतदार यादीत नावनोंदणीची अशी असेल प्रक्रिया

यापूर्वी नोंदणीकृत पदवीधर म्‍हणून नोंदणी केलेल्‍या व्‍यक्‍तींनी मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठीदेखील ऑनलाइन प्रक्रिया पार पाडायची आहे. याअंतर्गत संकेतस्‍थळावरील ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन पर्याय निवडून रजिस्‍टर्ड ग्रॅज्‍युएट पुढे अलरेडी रजिस्‍टर्ड ग्रॅज्युएट या पर्यायाची निवड करून लिंकमार्फत ऑनलाइन पद्धतीने माहिती भरायची आहे. व आवश्‍यक दस्‍तऐवजांची प्रत अपलोड करायची आहे, असे विद्यापीठाने कळविले आहे.

Pune University
जिल्ह्यात 108 ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण; दिवसभरात 14 बाधित, 13 कोरोनामुक्‍त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()