पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे समपातळी सर्वेक्षण तत्काळ करा

कालवाप्रश्नी बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रशासनाला सूचना
Minister Chhagan Bhujbal meeting.
Minister Chhagan Bhujbal meeting.sakal
Updated on

येवला : पुणेगाव-दरसवाडी डोंगरगाव पोचकालव्याचे खासगी यंत्रणेकडून समपातळी सर्वेक्षण करून येत्या ३० मेच्या आत राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.१८) अधिकाऱ्यांना दिल्या.आज जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा कामाच्या संदर्भात बोलाविण्यात आलेल्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे पाणी अद्यापपर्यंत डोंगरगावपर्यंत पोहोचू शकलेले नाही.  जुलै २०१९ मध्ये पहिल्यांदा मांजरपाडा कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात आले तेंव्हा पहिल्या प्रयत्नात मांजरपाडाचे पाणी १३० किमी बाळापूरपर्यंत पोहचले. जुलै २०२० मध्ये कोरोनामुळे प्रशासनाला कामे करायला अडचणी आल्या तरीही कातरणी गावापर्यंत कालव्याचे पाणी पोहचले आणि यावेळी चांदवड तालुक्यात कालवा पाण्याचा दाब वाढल्याने फुटला.

वणी येथील साडेतीन किमी बोगद्यातून वेगाने पाणी प्रवाहित होण्यास अडचण निर्माण होत होती म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीवरून ७ कोटी निधी मंजूर करत दोन किमी काम पूर्ण झाले आहे.उर्वरित दीड किमी काम ३० मेच्या आत पूर्ण करण्याचा सूचना भुजबळांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुणेगाव १ ते २५ कालवा विस्तारीकरणासाठी २ कोटी निधी मंजूर केला असून या कामातील संगमनेरे गावाजवळील अल्प प्रमाणात काम बाकी आहे. काम अपूर्ण राहिले तर दरसवाडीत पाणी २२० क्यूसेसने कसे प्रवाहित होणार असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करताच ३० मेच्या आत सर्व कामे पूर्ण करून घेतो असे आश्वासन मुख्य अभियंता संजय बेलसरे यांनी बैठकीत दिले.

लेंडी नाला पाणी पूर्वीप्रमाणे भाटगाव नदीतून दरसवाडीत वळवने, खडकओझर ते दरसवाडी ८ किमी कालवा साफसफाई करणे, दरसवाडी येथील गेट तात्काळ नवीन बसविणे आदि कामाच्या सूचना ना भुजबळ यांनी केल्या.बैठकीसाठी जिल्हाधिकारी गंगाधरण डी.,मुख्य अभियंता संजय बेलसरे,अधीक्षक अभियंता संदीप नाईक,अधीक्षक अभियंता अलका आहिरराव,मुख्य कार्यकारी अभियंता सौ संगीता जगताप,पाणी आंदोलक मोहन शेलार,भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,महेंद्र पवार,स्वीय सहाय्याक गालफाडे आदि उपस्थित होते.

पावसाअभावी पाणी कातरणीपर्यंत पोचले

जुलै २०२१ मध्ये चांगला पाऊस होत असताना मांजरपाडा धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे यंदा पाणी कातरणी पर्यंत पोहचले. कालव्यातून अपेक्षेप्रमाणे पाणी प्रवाहित झाले नाही.त्यामुळे पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव असे स्वतंत्र कालवा तळ पातळी सर्वेक्षण खाजगी यंत्रणेकडून तात्काळ करून घ्या,सर्वेक्षणात आढळून येतील त्या अडचणी वर १५ जूनच्या आत यांत्रिकी विभागाकडून काम करून घ्या अशा सूचना भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.