Nashik Crime: सरकारी डॉक्टरला मारहाणप्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा; आरोपीला 5 हजारांचा दंडही ठोठावला

 Court Order
Court Order esakal
Updated on

Nashik Crime : वडलांचे ऑपरेशन का करीत नाहीत, म्हणून सरकारी महिला डाॅक्टरला मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला नाशिक सत्र न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या दंडासह कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली. (Punishment pending court hearing in case of assault on government doctor fine of 5 thousand imposed on accused Nashik Crime)

अजमद अकबर खान (३३, रा. नाईकवाडीपुरा, भद्रकाली, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ओपीडीमध्ये महिला डॉ. स्नेहल विजयकांत बागडे या आरोपीच्या वडिलांची तपासणी करीत होत्या.

त्यावेळी आरोपी अजमद हा ओपीडीमध्ये घुसला आणि त्याने माझ्या वडिलांचे प्लॉस्टर व ऑपरेशन का करीत नाही, असे विचारून डॉ. बागडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व महाराष्ट्र वैदयकीय सेवा संस्‌था हिंसककृत्य मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 Court Order
Jalgaon Crime : धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोघांवर हल्ला

सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एच.एम. लांडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश यु.जी. मोरे यांच्यासमोर चालला.

सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रवींद्र एल. निकम यांनी कामकाज पाहिले. त्यानुसर न्या. यु.जी. मोरे यांनी आरोपी अजमद यास दोषी ठरवून त्यास ५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन आठवड्यांचा साधा कारावास, तसेच कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली.

पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस आर.जी. तांदळकर, हवालदार जी.आर. चिखले यांनी पाठपुरावा केला.

 Court Order
Jalgaon Crime : धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोघांवर हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.