Nashik Godavari News: गोदावरीची दुरवस्था करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; महापालिका आयुक्तांच्या सूचना

Speaking at the Godavari River Conservation meeting, Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Speaking at the Godavari River Conservation meeting, Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Updated on

Nashik Godavari News: गोदावरी नदीत सांडपाण्याचे नाले सोडणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, तसेच कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाईच्या सूचना महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची मासिक बैठक झाली. त्याअनुशंगाने गोदावरी प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमित आढावा घेण्यात आला. (Punitive action against Godavari pollution nashik news)

आयुक्त डॉ. करंजकर यांनी गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. गोदावरी नदीपात्रात सांडपाणी मिश्रित होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या, त्याचे नियोजन करावे, गोदावरी नदीत सांडपाणी सोडणारे व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार व कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश संबंधित विभागांना दिले.

या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीचा अंबड लिंकरोडवरील पूल, शिवम थेटर येथील पूल, गोरक्षनाथ पूल, सद्‍गुरूनगरजवळील चिखली नाला, गंगापूर रोड येथील चिखली नाला, परीचा बाग येथील गोदावरी किनार, चोपडा लॉन्सजवळील नाला आदींसह इतर नाल्यांचे पाणी गोदावरी प्रदूषित होऊ नये, यासाठी पाहणी केली.

Speaking at the Godavari River Conservation meeting, Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Nashik Bytco Hospital : आयुक्तांची बिटको रुग्णालयाला ‘सरप्राइज’ भेट

गोदावरी नदीत सांडपाणी मिश्रित होणार नाही याबाबत दक्षता घेऊन त्या संदर्भातील उपाययोजना करावी व त्याबाबतचे काम करणेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिले.

बैठकीला माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर, मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता गणेश मैंड, गोदावरी कक्षाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, जितेंद्र पाटोळे, उपअभियंता नितीन राजपूत, रवी पाटील, जितेंद्र कोल्हे, प्रशांत बोरसे, अशासकीय सदस्य निशिकांत पगारे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, विभागीय स्वच्छता निरीक्षक गोसावी आदी उपस्थित होते.

Speaking at the Godavari River Conservation meeting, Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Nashik News: उद्योजक अशोक कटारियांकडून फसवणूक; नितीन सुगंधी यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.