Nashik News : रेल्वे प्रवासातील भोजनात पुरणपोळी!; आवडीनुसार पाककृतींचा आस्वाद

puran poli
puran poliesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : रेल्वे प्रवासात महाराष्ट्रीयन पुरणपोळी मिळणार आहे. तसेच, ‘मेन्यू’मध्ये बाजरीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. भारतीय रेल्वेच्या खानपान प्रशासनाशी संलग्न असलेल्या ‘आयआरसीटीसी’तर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश होता. रेल्वेने आपल्या पदार्थांमध्ये काही पदार्थांची भर टाकली. रेल्वे मंत्रालयाने त्यासंबंधीचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध राज्यांतील प्रवाशांना आपल्या आवडीनुसार पाककृतींचा आस्वाद घेता येईल. (Puran Poli in food on train journey Taste cuisine as per your choice Nashik Latest Marathi News)

पौष्टिक तृणधान्य बाजरीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जगात २०२३ हे वर्ष ‘बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे ‘आयआरसीटीसी’तर्फे केंद्र सरकारच्या पौष्टिक खाद्यपदार्थांच्या उपक्रमाचा उत्सव साजरा करणार आहे. त्यातून आता ‘मेन्यू’मध्ये बाजरी असेल.

स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाला पसंती मिळते. प्रवासात काही रेल्वेगाड्यांमध्ये जेवणाची व्यवस्था असते. मात्र, रेल्वेने प्रवाशांसाठी एक पाऊल उचलले आहे. प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खानपान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ‘आयआरसीटीसी’ला अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरवण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्क समाविष्ट असते. अशावेळी अगोदर सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ ‘आयआरसीटीसी’ निश्‍चित करणार आहे.

प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असलेले अथवा प्राधान्य दिले जाणारे खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीच्या काळात मागणी असलेले पदार्थ, मधुमेहाच्या प्रवाशांना लागणारे भोजन, लहान मुलांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरड धान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ आदींचा समावेश प्रवाशांच्या जेवणात व्हावा, या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

puran poli
Nashik News : विवाह नोंदणीसाठी आलेख वाढताच

याशिवाय इतर मेल अथवा एक्स्प्रेस गाड्यांमध्येही अगोदर सूचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थांची निवड ‘आयआरसीटीसी’द्वारे करण्यात येणार आहे. जनता गाड्यांमधील जेवणाची यादी आणि शुल्क यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठीचे शुल्क ‘आयआरसीटीसी’तर्फे निश्‍चित करण्यात येणार आहे.

रेल्वेगाड्यांमध्ये अनेक रेल्वे स्थानकांवर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते चढतात. या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि दरावर कोणाचेही नियंत्रण नसते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवासात विविध प्रकारच्या ‘मेन्यू’मध्ये खाद्यपदार्थांची मागणी नोंदवता येऊ शकेल. आवड आणि स्वादानुसाह विविध प्रकारच्या पाककृती मिळणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

puran poli
Nashik News : साहेब, रस्त्याचा प्रश्‍न सोडवा हो!

ठळक मुद्दे

० प्रवाशांना प्रादेशिक पाककृती तथा वस्तू आणि नियमित ‘मेन्यू’सह विविध पर्यायांमधून निवडीची सुविधा

० ‘आयआरसीटीसी’ ‘मेन्यू’मध्ये बाजरीच्या समावेशाची तयारी सुरू

० ‘आयआरसीटीसी’चा उद्देश प्रादेशिक, हंगामी पाककृती आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे

० ‘आयआरसीटीसी’ रुग्ण, आरोग्याविषयी जागरूक प्रवासी आणि लहान मुलांच्या विशेष गरजांची काळजी घेण्यासाठी आहाराची आखणी

आहार करतो आरोग्याचे रक्षण

आहार : प्रीणनः सद्यो बलकृद्देहधारकः।

आयुस्तेज : समुत्साहस्मृत्योजोऽग्निविवर्द्धनः।

आयुर्वेदाची आहारविषयक शिकवण. अर्थात, निरोगी व्यक्तींच्या आरोग्याचे रक्षण आणि आजार रोखण्यासाठी आहार औषधांपेक्षा कमी नाही. आहाराने संतुष्ट होत असताना शक्ती मिळते. वय, तीक्ष्णता, उत्साह, स्मरणशक्ती, ऊर्जा व पचनशक्ती वाढते.

puran poli
Nashik News : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.