Nashik News: सौरऊर्जा प्रकल्पासाठी चक्क वनजमिनीची खरेदी विक्री; व्यवहार रद्द करण्याची वनविभागाची मागणी

forest
forestsakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : नियोजित सौरऊर्जा प्रकल्पासाठी वनविभागाच्या जमिनीचीच खरेदी विक्री झाल्याचे दाखवून खासगी व्यक्तीचे सातबारा उताऱ्यावर लागलेली नोंद रद्द करून या व्यवहाराला मान्यता देणाऱ्या संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी नाशिकच्या वनविभागाचे (पूर्व) उपवनसंरक्षक यांनी केली आहे.

वनविभागाने आपल्या क्षेत्राची परस्पर झालेल्या खरेदी विक्रीला आक्षेप घेतल्याने अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जमीन घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेला तालुका पुन्हा एकदा दृष्टीक्षेपामध्ये आला आहे. (Purchase and sale of forest land for solar power project Forest Department demand to cancel transaction Nashik News)

तालुक्यातील डॉक्टरवाडीच्या सर्वे दहा मधील काही क्षेत्रातील जमिनीची गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात खरेदीविक्रीचे व्यवहार करण्यात आले आहे. या व्यवहारांना सातबारा उताऱ्यावर लागलीच फेरफार नोंदी घेण्यात आल्याची कायदेशीर प्रक्रिया देखील गतिमान पद्धतीने करण्यात आली.

डॉक्टरवाडी शिवारात वनविभागाचे १ हजार ७८४ एकराचे क्षेत्र असून त्यातील १ हजार १४७ एकर व ३३ गुंठ्याचे निर्विकरण झालेले आहे. ते वजा करता उर्वरित क्षेत्रात ७६२ एकर क्षेत्र राखीव वन यासाठी आहे.

यात आता या वन जमिनीची नोंद बदलून त्या क्षेत्राला वनेत्तर दाखविण्यात येऊन खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचा आक्षेप वन विभागाने घेतला आहे. असे करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या १९९६ मधील टी.एन. गोदावरम केसचा हवाला देताना झालेल्या खरेदी विक्रीची नोंद रद्द करण्याची मागणी वनविभागाने केली आहे.

दरम्यान वनविभागाकडून निर्विकरण झाल्यावरच डॉक्टरवाडी येथील श्रीकृष्ण फार्मिंग सोसायटीला जमिनीचे वाटप तत्कालीन सक्षम यंत्रणेने केल्याचा दस्तऐवज असल्यामुळे खऱ्याखोऱ्या औद्योगिक प्रयोजनार्थ खरेदी करिता गट रिलीज केल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे. शासकीय जमिनी व त्यांच्या नियंत्रणावरचा कलगीतुरा कुठल्या वळणाने जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

नाशिकच्या वनविभागाचे (पूर्व) चे वनसंरक्षक उमेश वावरे यांनी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना गेल्या महिना अखेरीस पाठविलेल्या पत्रानंतर त्यांनी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना येवला प्रांताधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

forest
World Economic Forum : विदेशी गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ परिषदेत नाशिकचे विशेष Branding!

कशासाठी जमिनी विक्री?

कुठल्याही स्थितीत जुलै २०२३ पूर्वी शंभर मेगावॅट क्षमेतचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित व्हावा असे उद्दिष्ट ठेवून देशातील नामंकित कंपनीच्या उपकंपनीचा प्रकल्प नांदगाव जवळील डॉक्टरवाडी शिवारात उभारला जाणार आहे. आणि या प्रकल्पात निर्माण होणारी वीज कोकणातल्या एका बड्या स्टील कंपनीला पुरविली जाणार आहे.

त्यासाठी काही शेकडो एकर जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार गेल्या वर्षभरात अतिशय वेगवान पद्धतीने करण्यात आला. ज्या जमिनीवर वाद आहेत त्यांच्याकडे जमिनी असल्याचा पुरावा नसल्याचे हेरून या मिळकती ताब्यात घेण्याचा झपाटा लावण्यात आला. मात्र या घाईगडबडीत चक्क वनविभागाचीच जमीन घेतल्या गेल्याने या व्यवहाराला वेगळे वळण मिळाले आहे.

forest
Nashik News : NMC क्षेत्रातील आस्थापनांच्या मराठी फलकसंदर्भात आवाहन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.