NAFED Onion Purchase: नाफेडतर्फे 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी? नोडल एजन्सी मार्फत कांद्याची खरेदी

Onion purchase NAFED nashik
Onion purchase NAFED nashikesakal
Updated on

NAFED Onion Purchase : केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने यावर्षी नाफेडतर्फे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ या दोन नोडल एजन्सी मार्फत कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे.

सद्यःस्थितीत बाजारात दर पडलेले असल्याने त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व ज्यावेळी बाजारात कांद्याचे दर वाढतील त्यावेळी हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणण्याचे ग्राहक मंत्रालयाचे प्रयत्न सुरु केले आहेत. (Purchase of 3 lakh metric tons of onion by NAFED Procurement of Onion through Nodal Agency nashik news)

गेल्या वर्षी कांदा खरेदी व सुरक्षित साठवणुकीचा अनुभव असलेल्या व काही नव्याने पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांचे १८ महासंघ यांना यावेळी नाफेडने चर्चेसाठी बोलाविले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार,

कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते. यंदा मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे मोठे झाल्याने सुमारे तीनशेहून अधिक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे खरेदीकेंद्र सुरु करतील अशी शक्यता आहे.

कांद्याची खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत प्रचलित बाजार दरानुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते.

मागील वर्षी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ३५१ कोटी रक्कमेचा २ लाख ३८ हजार १९६ टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी १ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. या वर्षीदेखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने ‘नाफेड’ मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक मंत्रालयाकडे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Onion purchase NAFED nashik
Nashik News : एका उंटामागे रोजचा खर्च 300 रुपयांचा; पांजरपोळमधील उंटांना शेंगदाणे अन गूळ असे खाद्य

कांदा खरेदीत पारदर्शकता हवी

बाजारात कमी दराने खरेदी करून नाफेडच्या प्रचलित दरात खरेदी दाखविण्याचा प्रकार काही उत्पादक कंपन्यांकडून होतो. यावर्षी देखील सध्याचे बाजारातील कमी झालेल्या दराचा नाफेडचे खरेदीदार फायदा उठवतील.

त्याचप्रमाणे मागील वर्षी ७० ते ८० टक्के रिकव्हरी असताना कमी रिकव्हरी दाखविली गेली. यामुळे नाफेडच्या खरेदीत मागील वर्षी साशंकता निर्माण झाली होती. यावर्षी नाफेड प्रशासनाने पात्र उत्पादक कंपन्यांनाच खरेदीचा परवाना द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

"नाफेडने किमान दीड हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करावी. १५ जून पर्यंत पन्नास टक्के म्हणजे किमान दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा." - कृष्णा जाधव, उपजिल्हाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना, नाशिक.

Onion purchase NAFED nashik
Nashik News : G 20 ही भारताला विश्वगुरू बनवण्यासाठीची एक सुरवात : राजेश पांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()