NAFED Onion Purchase : मोठा गाजावाजा करीत ‘नाफेड’ने कांदा खरेदी सुरू केली असून, ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीबाबत होर्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
‘नाफेड’ने कांदा खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याला दोन हजार ४१० रुपये भाव देऊन वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला.
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यावर राज्यभरात कांदा प्रश्नावर रान पेटलेले असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि ‘एनसीसीएफ’मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली. (Purchase of farmers onion from NAFED in terms nashik news)
मात्र, ‘नाफेड’कडून कांदा खरेदी करताना जाचक अटी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये ‘नाफेड’कडे कांदा विक्री करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये सात-बारा उताऱ्यावर उन्हाळ कांद्याची नोंद असताना ती नोंद २०२३ वर असल्यास कांदा खरेदी होईल, असे ‘नाफेड’कडून सांगण्यात येते. तलाठी मात्र २०२३ च्या उताऱ्यावर तशी नोंद करता येणार नाही, असे सांगत असल्याने ‘नाफेड’ला कांदा विक्री करताना शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लादण्यात आल्या असून, यात ‘वास येणारा, रंग गेलेला, विळा लागलेला, काजळी बसलेला’ कांदा स्वीकारला जाणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नाफेड’मार्फत बाजार समितीवर तत्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश काढले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आदेश काढल्यावर तीन दिवसांनी लासलगाव येथे ‘नाफेड’ने कांदा खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ‘नाफेड’ने कांदा खरेदीसाठी लावलेल्या नियम व अटी पाहता शेतकऱ्यांचा कांदा नाफेड केंद्रावर विक्री होणार तरी कसा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बाजार समित्यांबाहेर खरेदीबाबतचे होर्डिंग ‘नाफेड’तर्फे लावण्यात आले आहेत.
‘नाफेड’च्या होर्डिंगवर दिलेले नियम व अटी
‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीला सुरवात झाली असून, लासलगाव बाजार समिती परिसरात खरेदी केंद्र सुरू आहे. या खरेदी केंद्राबाहेर ‘नाफेड’मार्फत होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. यात शेतकरी बांधवांसाठी सूचना दिलेल्या आहेत. यात प्रतिहेक्टर २८० क्विंटलपेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही.
दर्जेदार ५० ते ५५ मिलिमीटरच्या पुढचा चांगला कांदा चालेल, असे सूचित करण्यात आले आहे. खालील गुणवत्ता असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही. यात विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, बुरशीजन्य, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, बुरशीजन्य, वास येत असलेला, मुक्त वेल असलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.