NAFED Onion Purchase : ‘नाफेड’ तर्फे आजपासून उन्हाळ कांद्याची खरेदी होणार सुरु

purchase of summer onion will be started from today by NAFED nashik  news
purchase of summer onion will be started from today by NAFED nashik newsesakal
Updated on

Nashik News : ‘नाफेड’ तर्फे राज्यात गुरुवारपासून (ता.१) उन्हाळी कांद्याच्या खरेदीची सुरवात होत आहे. उमराणे (ता. देवळा) येथील कांदा खरेदी केंद्रावर खरेदीचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होईल. (purchase of summer onion will be started from today by NAFED nashik news)

आमदार डॉ. राहुल आहेर, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित राहतील.

राज्यात ‘नाफेड' आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघातर्फे ३ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे. डॉ. पवार म्हणाल्या, की ‘नाफेड'तर्फे कांदा खरेदी व्हावी म्हणून विविध शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकरी यांच्याकडून होणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

purchase of summer onion will be started from today by NAFED nashik  news
MIDC Water Bill : पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही; अंबडच्या उद्योजकांना दिलासा

त्यानुसार गुरुवारपासून जिल्ह्यात १४ फेडरेशन व नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांतर्फे आणि पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नगर जिल्ह्यात कांदा खरेदीला सुरवात होत आहे.

तसेच कांद्याचे भाव वाढावा म्हणून ‘नाफेड' खरेदी करत नसून कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग, अन्न आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार कांद्याचा ‘बफर स्टॉक' करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेतंर्गत कांद्याची खरेदी केली जात आहे.

purchase of summer onion will be started from today by NAFED nashik  news
Sakal Exclusive : घोरणाऱ्या 40 टक्‍के व्‍यक्‍तींना Sleep apneaचा धोका.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.