आधारभूत मका खरेदीत राज्यात 'हा' जिल्हा अव्वल...!

maize-18-640.jpg
maize-18-640.jpg
Updated on

नाशिक : राज्यात आधारभूत मका खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनने राज्यभरात २० जिल्ह्यांमध्ये भरड धान्य मका खरेदीमध्ये सात लाख ३९ हजार ४०८.६५ क्विंटल मका खरेदी केली आहे. यामध्ये राज्यातील १७ हजार १०५ शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात आली आहे. 

६.५ लाख क्विंटल मका खरेदी

राज्यातील १७ हजार १०५ शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यामध्ये उच्चांकी खरेदी झाली आहे. तर त्या खालोखाल बुलडाणा व नाशिक जिल्ह्यात खरेदी झाली आहे. मात्र, राज्यात मका खरेदीचा लक्ष्यांक जरी पूर्ण झाला असला तरी राज्यात हजारो शेतकरी मका खरेदीवाचून वंचित असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील मका खरेदीत पहिल्या टप्प्यात २.५ लाख क्विंटल खरेदी झाली. लक्ष्यांक पूर्व झाल्यानंतर केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे राज्य सरकारने पाठपुरावा केल्यानंतर ६.५ लाख क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. मात्र, असे होऊनही अद्यापही हा लक्ष्यांक पूर्ण झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या खळ्यांवर व गुदामात मका पडून आहे. 

अनेक शेतकऱ्यांना ना खरेदीचे मेसेज, ना निरोप...

राज्यात जळगाव जरी अव्वल असले तरी येथेही १७ हजार ७२७, तर नाशिकमध्ये चार हजार ५२८ शेतकरी खरेदी न झाल्याने वंचित राहिले आहेत. एकीकडे हमीभावाच्या खाली दराने मका खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीला प्राधान्य दिले. मात्र, त्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांना ना खरेदीचे मेसेज आले ना निरोप आले, त्यामुळे खरेदीसाठी नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. 

फेडरेशनचे महाव्यवस्थापक माहितीबाबत अनभिज्ञ? 

राज्यात १७ हजार १०५ शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनने मका खरेदी झाली आहे. या प्रक्रियेत किती शेतकऱ्यांनी राज्यभर पूर्वनोंदणी केली अन् यातून किती शेतकरी खरेदीवाचून वंचित राहिले, याबाबत राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या महाव्यवस्थापकांना विचारले असता, अजून माहिती घेतली नसून ती उपलब्ध नाही. काम सुरू आहे. माहिती देऊ शकत नाही, असे सांगत बोलणे टाळले. त्यामुळे किती नोंदणी झाली अन् किती शेतकरी वंचित राहिले याबाबत ते स्वतः अनभिज्ञ आहेत. 

ठळक मुद्दे 

-राज्यात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात मका खरेदी 
-राज्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ 
-नागपूर जिल्ह्यात सर्वांत कमी मका खरेदी 
-अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वांत अधिक लाभ 

जिल्हानिहाय झालेली खरेदी 
जिल्हा...खरेदी (क्विंटल)...शेतकरी 

नगर...१६८७२.६८...६८४ 
अकोला...१८६२०.५०...४३८ 
अमरावती...१२३५.५०...१५ 
औरंगाबाद...८०२९९.५०...२६०४ 
भंडारा....१६४२.९०...५६ 
बुलडाणा...१२३२७८.२३...२०६७ 
चंद्रपूर...२५६६.७७...६५ 
धुळे...४४७२०...८१० 
गडचिरोली...४७३०३.५०...९०५ 
गोंदिया...४८२७...९६ 
जळगाव...१८९९१४.५०...२५४४ 
जालना...४५२७१.५५...११८६ 

नागपूर...८१६.५२...२४ 
नंदुरबार...१२१३२.५०...२७७ 
नाशिक...८८२६८...२७६६ 
पुणे...४१३९...२१६ 
सांगली...२३८३.५०...१२१ 
सातारा...४६५७.५०...२९५ 
सोलापूर...५०४५८.५०...१९३६ 
एकूण...७३९४०८.५०...१७१०५ 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.