शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार पुष्पा पाटील यांच्‍याकडे

vaishali veer zankar
vaishali veer zankaresakal
Updated on

नाशिक : आठ लाख रुपयांच्या कथीत लाच प्रकरणात ( education officer bribe case) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शिक्षणाधिकारी वैशाली वीर- झनकर (vaishali veer zankar) या मुख्य संशयित आहेत. त्‍यांना अटक होऊन बरेच दिवस उलटूनही शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी अन्‍य अधिकाऱ्यांकडे सोपविलेली नव्‍हती. लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित वैशाली वीर- झनकर (vaishali veer zankar) यांच्या निलंबनाची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सध्या सुरू आहे. या दरम्‍यान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदाचा प्रभारी पदभार शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालक पुष्पा पाटील (pushpa patil) यांच्‍याकडे सोपविण्यात आला आहे. कारवाईनंतर विभागाच्‍या ठप्प झालेल्‍या कामांना यामुळे गती मिळण्यास मदत होणार आहे.

वैशाली वीर-झनकर यांच्यावर कारवाईमुळे विभागातील कामे ठप्प
रक्षाबंधन व सणासुदीच्‍या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांच्या वेतनासह विभागातील अन्‍य महत्त्वाची कामे ठप्प झालेली होती. एकीकडे न्‍यायालयीन सुनावणी सुरू असताना शिक्षण विभागाकडे त्यांच्‍या निलंबनाचा प्रस्‍तावदेखील सादर करण्यात आलेला होता. निलंबन आदेशात प्रभारी पदभाराविषयी सविस्‍तर सूचना नमूद असतील, असे सूत्रांकडून सांगितले जात होते. मात्र, निलंबनाच्‍या प्रक्रियेला विलंब होत असतानाच, सध्या प्रभारी शिक्षणाधिकारी म्‍हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालक पुष्पा पाटील यांना सोपविला आहे.


निलंबन आदेश आज?
कायदेशीरदृष्ट्या वीर-झनकर यांच्‍यावर विभागातर्फे निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित असून, यासंदर्भातील प्रक्रियादेखील सुरू आहे. गेल्‍या आठवड्यात रविवार (ता. १५) व सोमवारी (ता. १६) पतेतीनिमित्त शासकीय सुटी आल्‍याने प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्‍हती. दरम्‍यानच्‍या काळात विभागातर्फे पोलिस व न्‍यायालयीन कारवाईचा तपशील नमूद करत पुन्‍हा निलंबनाचा प्रस्‍ताव सादर केला गेला. यासंदर्भात आता सोमवारी (ता. २३) निलंबन आदेश जारी होण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

vaishali veer zankar
...अन् डॉ.भारती पवार सासूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या!
vaishali veer zankar
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात अवघे 59 कोरोना पॉझिटिव्‍ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.