Nashik News | रस्त्यावरील विक्रेत्यांना दुसरीकडे बसवा : नाशिकवेस मंडळाचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे

Officials, activists of Nashik Weis Mitra Mandal giving a statement to Principal Sanjay Kedar.
Officials, activists of Nashik Weis Mitra Mandal giving a statement to Principal Sanjay Kedar.esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील नाशिक वेस परिसरात रस्त्यावरच विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने याठिकाणी येणाऱ्या पादचारी व वाहनधारकांची गैरसोय होत असून याठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने याठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांची दुसरीकडे व्यवस्था करण्याची मागणी नाशिक वेस मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी संजय केदार व पोलिसांना केली. या बाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले. (Put street vendors on other side Nashikves Mandal to chief officer Nashik News)

नाशिक वेस शहराच्या मध्यभागी असून गावात जाण्या - येण्याकरीता वाहनधारक या रस्त्याचा सर्रास वापर करत असतात. या परिसरात वेशीच्या बाजूला रस्त्यावर (भगत सन्स दुकान ते खासदार पूल ) मोठ्या प्रमाणात दुकाने लावत असल्यामुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे दररोज या भागात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

शालेय बसही वाहतूक कोंडीत अडकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा धक्का लागून आपसांत वाद होण्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर बसलेले अनधिकृत विक्रेत्यांचे दुसरीकडे बसण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Officials, activists of Nashik Weis Mitra Mandal giving a statement to Principal Sanjay Kedar.
Dhule News : वक्फ बोर्डाच्या जागांप्रश्‍नी महासभेत जुंपली

यावेळी माजी नगरसेवक मनोज भगत, नाशिक वेस मंडळाचे अध्यक्ष राहुल भावसार, अतुल बोऱ्हाडे, राजेंद्र भोकरे, पुष्पराज पेखळे, मिथुन बाकळे, आकाश लोखंडे आदी उपस्थित होते.

"शहराची मुख्य बाजारपेठेचे प्रवेशद्वार नाशिक वेस मानले जाते. यामुळे बाजारपेठेला कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यात दुकानदारांचे अतिक्रमण, फळे, भाजीपाला विक्री तसेच अनेक व्यवसाय करणाऱ्यांची गर्दी मोठी आहे. नाशिक वेस येथील सरस्वती मंदिर हा शहरातील मुख्य चौकांमध्ये मोडतो. चौकाला चहूबाजूंनी किरकोळ विक्रेत्यांचा पडलेला वेढा वाहतूक कोंडी होण्यास प्रमुख कारण ठरत आहे."- मनोज भगत, माजी नगरसेवक

Officials, activists of Nashik Weis Mitra Mandal giving a statement to Principal Sanjay Kedar.
Nashik News : वनराई बंधारेमुळे पाणी पातळीत वाढ! जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.