MNS News: मराठीत पाट्या लावा नाही, तर 2 हजारांवर दंड! मनसेच्या आंदोलनानंतर येवला नगरपालिका ॲक्शन मोडवर

MNS News
MNS Newsesakal
Updated on

येवला : शहरातील सर्वच दुकानदारांनी दुकानांच्या पाट्या मराठीत लावाव्यात. त्यासाठी न्यायालय व शासनाने दिलेले निकषही पाळावेत, अन्यथा दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दोन हजार रुपयांप्रमाणे दंड भरावा लागेल, अशी नोटीस नगरपालिकेने काढली आहे.

त्यामुळे शहरातील सर्वच दुकानदारांना दुकानांच्या पाट्यांचे मातृभाषेत नामकरण करावे लागणार आहे. (put up signs in Marathi you will be fined 2 thousand Yewla municipality on action mode after MNS agitation nashik)

शहरातील अनेक दुकानांची नावे इंग्रजीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही नावे मराठीत असणे अत्यावश्यक आहे, असा इशारा देत मागील आठवड्यात मनसेने पालिकेसह पोलिसांना निवेदन दिले होते.

त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी यासंदर्भात सामूहिक नोटीस प्रसिद्ध केली आहे.

उच्च व सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, तसेच शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या पत्रान्वये प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असावा.

मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

MNS News
Nashik: पोटहिस्से नसल्याने सरकारी मोजणीस अडथळा! देवळालीतील शेतकऱ्यांसह लक्ष्मण मंडाले यांचे शरद पवारांना साकडे

अधिनियानुसार नगरपरिषद क्षेत्रांतील सर्व दुकाने व आस्थापनाधारकांनी त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे.

पालिका कार्यक्षेत्रांतील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल्स आदींनी नामफलक मराठी भाषेतच लावावेत. नामफलक मराठी भाषेत नसतील, अशा आस्थापनाधारकांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कामगारप्रमाणे दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत दिला आहे.

हा बदल तत्काळ करावा, अन्यथा पालिकेचे पथक भेटी देऊन पाहणी करेल. त्यावेळी दुकानदारांना दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

MNS News
NMC News: महापालिकेची सुरक्षा ठीकठाक! संसद घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक आयुक्तांकडून आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.