अंतिम वर्षाच्या परिक्षांवर प्रश्नचिन्ह कायम...विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात!

exam final.jpg
exam final.jpg
Updated on

नाशिक : (येवला) अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक ओळीचाही निर्णय जाहीर नसल्याने अडीच लाख विद्यार्थ्यांचा करिअरचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, तर पालक गोंधळात पडले आहेत. प्राध्यापक संभ्रमात असल्याने विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यावे, हा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

ऑनलाइन किंवा ऑफलाइन अध्यापनाची तयारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक हजार 44 महाविद्यालयांतील तृतीय वर्षातील तब्बल दोन लाख 46 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. सोमवार (ता. 15)पासून प्राध्यापकांना महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहण्यास सांगून सुविधा-संसाधने अद्ययावत करणे, माहिती देण्यासह विविध कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रथम वर्षाचे अध्यापन 1 सप्टेंबर व इतर सर्व वर्षांचे अध्यापन 1 ऑगस्टपासून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अध्यापनाची तयारी करायची आहे. अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन, जर्नल, मौखिक परीक्षा व इतर गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेचा निर्णय होत नसल्याने गोंधळ

बॅकलॉक असणाऱ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थी खूश आहेत. अभ्यासक्रम 50 ते 70 टक्के पूर्ण झाला नसून सबमिशन बाकी आहे. प्रॅक्‍टिकल, तोंडी परीक्षा, प्रोजेक्‍ट तपासणी बाकी असताना गुणदान अन्‌ परीक्षा कशी होणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना पडला आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या तंत्रनिकेतन व डी. फार्मसीच्या परीक्षेचे असेच भिजत घोंगडे पडलेय. क्रेडिट पद्धतीत अगोदरच्या सर्व टर्मची सरासरी काढली जाणार असल्याने अंतिम वर्षाच्या गुणांवर फारसा फरक पडणार नसल्याचे सांगितले जाते; पण परीक्षेचा निर्णय होत नसल्याने गोंधळात अजून भर पडत आहेत. 

आधी सुरक्षा मग परीक्षा 

विद्यापीठासह अनेक शिक्षणसंस्था परीक्षा घेण्याच्या विचारात आहेत. त्याबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे. पण पालक व विद्यार्थी "आधी सुरक्षा मग परीक्षा', अशा भूमिकेत आहेत. त्यामुळे परीक्षा घ्यायची झाली तर ती केव्हा घेणार आणि निकाल केव्हा देणार, यावरही टांगती तलवार आहे. 

परीक्षा घ्यायच्या असेल तर जाहीर करा, नसेल तर तसे सांगा. पण विद्यार्थ्यांच्या भावनांचा खेळ करू नका. एकतर अभ्यासक्रम पूर्ण नसून सबमिशन व इतर वर्क बाकी आहे. त्यात सुरू असलेल्या टाइमपासमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. - निखिल आव्हाड, विद्यार्थी, संदीप फाउंडेशन, नाशिक 

ग्रामीण भागातील माझ्यासारखे हजारो विद्यार्थी सध्या घरी आहेत. अचानक लॉकडाउन झाल्याने पुस्तके, नोट्‌स होस्टेलच्या रूमवर अडकले. आता बाहेर जाण्यासाठी परवानगी नाही. त्यातच वडील म्हणतात, "जान है तो जहान है'. अशा स्थितीत कसा अभ्यास करणार आणि परीक्षेला कसे सामोरे जाणार, हाच मोठा प्रश्‍न पडलाय. - उमेश पगार, विद्यार्थी, एसएनडी अभियांत्रिकी, बाभूळगाव 

पुणे विद्यापीठातील महाविद्यालये 

आर्किटेक्‍चर  26 
अभियांत्रिकी  118 
कला वाणिज्य व विज्ञान  455 
बीएड व बीपीएड 119 
फाइन आर्ट, क्राफ्ट्‌स  7 
विधी (लॉ)  28 
एमबीए  187 
मानस नीती व समाजविज्ञान : 19 
प्रयोग, नीती व कला  4 
फार्मसी (बी व एम)  64 
फार्मसी (डी)  396 (राज्यातील) 
तंत्रनिकेतन  401 (राज्यातील) 

जिल्हानिहाय महाविद्यालये 

पुणे  683 
नगर  162 
नाशिक  190 
दादर नगर हवेली  4 
मुंबई  2 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.