पोट पाणी महत्त्वाचे की हनुमान जन्मस्थळ वाद?; भुजबळांचा सवाल

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

नाशिक : लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्‍न आहे. महागाईचा (Inflation) भस्मासुर दिवसेंदिवस वाढतं आहे. या परिस्थितीत हनुमान जन्मभुमीचा वाद उकरायचे कारण काय असा सवाल उपस्थित करताना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हनुमान जन्मभुमीच्या (Hanuman Birthplace Controversy) वादात उडी घेत, महागाईकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. (Question of Chhagan Bhujbal on Hanuman Birthpace Controversy Nashik Politics News)

श्री हनुमान जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किश्‍किंधा येथील काही लोकांनी अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ नसल्याचा दावा केल्यानंतर त्यावरून आता राजकारण रंगले आहे. जिल्हा परिषदेत आढावा बैठकीसाठी श्री. भुजबळ आले असता त्यांनी या वादावर टिप्पणी केली. ते म्हणाले. हनुमान जन्मस्थळाचा वाद उकरायचे कारण काय? कोणी काहीही म्हणेल त्यामागे आपण धावत जायचे हे योग्य नाही. यात नुकसान आपलेच आहे. कोणीतरी एखादा येतो, दररोज काही ना काही उकरून काढतो. याला अर्थ नाही. हे थांबले पाहिजे. संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागते. आम्ही कामे कधी करायची असा उदिग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. रोज काही ना काही वाद उत्पन्न केले जातात. परंतु बेरोजगारी, महागाई, शेती, पाणी या सारखे अनेक प्रश्‍न असताना त्यावर चर्चा का केली जात नाही. परमेश्‍वर प्रत्येकाच्या मनात आहे. ज्याने-त्याने आपल्या परीने पूजा करावी. अन्य विषयांकडेच लक्ष वेधून सरकारी यंत्रणेला वेठीस धरणे योग्य नाही. अशा प्रकारचे उद्योग लोकांना समजावून सांगितले पाहिजे असा सल्ला भुजबळांनी दिला.

Chhagan Bhujbal
Nashik : लाभार्थ्यांना मिळणार नियतनानुसार धान्य

केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष द्यावे
इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पंप चालकांनी घेताना संप पुकारण्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना भुजबळ यांनी केंद्र सरकारकडूनच इंधनाचा स्टॉक कमी येत असल्याचे सांगताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Chhagan Bhujbal
लग्नासाठी जमला सारा गोतावळा; चोरट्यांनी सोन्यावर मारला डल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.