Nashik Water Crisis: मोसम खोऱ्यात रब्बी हंगाम धोक्यात! जलसाठे कोरडेठाक; खरीप पिकांचेही नुकसान

Due to lack of rain, dried maize became fodder
Due to lack of rain, dried maize became fodderesakal
Updated on

बिजोरसे : बागलाण तालुक्यासह मोसम खोऱ्यात यंदा पावसाळ्यात फक्त तीन ते चार पाऊस झालेत. शेवटचे दोन महिने नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे जमीन कोरडी पडली आहे.

खरीप हंगामातील पिकांनाच पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी कुठून येणार. पाण्याअभावी यावर्षी रब्बीचा हंगामही धोक्यात येणार असल्याचे चित्र आहे. (Rabi season in danger in Mosam Valley water bodies drying up Damage to kharif crops too nashik )

पावसाळ्यात पुरेसा पाऊस मोसम खोऱ्यात न झाल्याने खरिपातील या भागातील हक्काचे पीक म्हणून लागवड करण्यात आलेल्या मका पिकातून लागवड खर्चही निघणे अवघड झाले आहे. चारा म्हणूनच तो उपयोगात येणार आहे.

बाजरीची ही वाढ खुंटली. कपाशीची तर अगदी बिकट अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकावर होती. मात्र सध्या स्थिती पाहिली तर रब्बी हंगामाचे भवितव्य अंधारात आहे.

यंदाचा परतीचा पाऊस चांगला पडला असता तर रब्बी साठी जमिनीत ओलावा असला असता. पण पाऊस पडला नसल्याने आता रब्बी हंगाम घेणे मुश्कील झाले आहे. एवढेच नाही तर नदी, नाले, पाझर तलाव, विहिरीही कोरडेठाक पडले आहेत.

त्यामुळे रब्बी पिकांची गहू, हरभरा यांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला उभा आहे. कांदा रोपे तयार आहेत, पण विहिरींनी तळ गाठला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतजमीन तयार करून ठेवली.

Due to lack of rain, dried maize became fodder
Nashik Water Crisis: लासलगाव विंचूरसह सोळा गावांवर पाणीटंचाईचे सावट! थकीत वीजबिलाबाबत महावितरणकडून नोटीस

पण शेवटी उत्तर नक्षत्राचा पावसानेही पाठ फिरवली. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला व आर्थिक तूट भरून काढण्याची संधीही निसर्गाने हिरावून घेतली.

"यावर्षी पावसाने दगा दिला. खरिपाची पिके धोक्यात आले. खरिपांच्या पिकांना झालेला खर्चही उत्पादनातून निघालेला नसल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. आता शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामाकडे होती पण पाऊस नसल्यामुळे सर्व गणित चुकले."

- वसंत मोरे, शेतकरी बिजोरसे

"विहिरींना पाणी नाही, त्यामुळे गहू हरभरा कांदा लागवड होणे दुरापास्त आहे. कडक ऊन पडत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा सडला. शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे."- योगेश पाटील, शेतकरी, काकडगाव

Due to lack of rain, dried maize became fodder
Nashik Water Crisis: 8 महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा! येवल्यात 47 वाड्यावस्त्यांची तहान भागते टँकरवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.