Nashik News: येवला तालुक्यात रब्बी हंगामाला खो! पालखेड आवर्तनाचे दिवस, तारखा ठरत नसल्याने शेतकरी संभ्रमात

Rabi season in Yevla taluka Farmers confused days and dates of Palkhed rotation not fixed
Rabi season in Yevla taluka Farmers confused days and dates of Palkhed rotation not fixedesakal
Updated on

येवला : तालुक्यातील रब्बी हंगामाचे संपूर्ण नियोजन पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर ठरते. यंदा धरणात पाणी असूनही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी नियोजित आवर्तने मिळणार का, हा प्रश्न आहे.

सिंचनासाठी किती आवर्तने देणार, हे निश्चित नसल्याने रब्बी हंगामाच्या पिकांच्या नियोजनाला खो बसला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलल्याने आवर्तनाचे नियोजन अजून लांबणीवर पडले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. (Rabi season in Yevla taluka Farmers confused days and dates of Palkhed rotation not fixed Nashik News)

धरणे तुडुंब भरली असून, पुरेशा प्रमाणात पाणी देणे शक्‍य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पिकांचे नियोजनासाठी पाटबंधारे विभागाने पालखेड डाव्या कालव्यातून दिली जाणारी आवर्तने व त्याचा कालावधी निश्चित करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.

मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. तालुक्याचा खरीप व रब्बी हंगाम पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. यंदा खरिपाचे अल्प पावसामुळे पूर्णतः नुकसान झाले आहे. तालुका अवर्षणप्रवण असल्याने उत्तर-पूर्व भागात भयावह दुष्काळ परिस्थिती आहे.

पिण्यासाठी पाणी नाही. पश्चिम भागात पालखेडच्या पाण्यावर रब्बी हंगाम पिकण्याचा आशावाद आहे. दर वर्षी पालखेड डाव्या कालव्याच्या भरवशावर शेतकरी रब्बीच्या पिकांचे नियोजन करतात.

यंदा पूर्ण क्षमतेने दोन आवर्तने मिळतील, असा आशावाद आहे. सरतेशेवटी टंचाई निर्माण होऊन फसगत होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना पालखेडच्या नियोजनाची माहिती देणे गरजेचे आहे.

पाटबंधारे विभागाने आवर्तनाची संख्या, त्याचा कालावधी निश्चित करावा व शेतकऱ्यांना पीक नियोजनासाठी मार्ग मोकळा करण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधींमुळे लांबली बैठक

विहिरी कोरड्या पडल्याने कालव्यास पाणी सुटण्याची पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

शासकीय नियमानुसार रब्बी हंगाम १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. या हंगामातील पिकांना पाणी मिळावे, यासाठी कालवा सल्लागार व नियोजन समितीची बैठक हंगाम सुरू होण्यापूर्वी किंवा हंगाम सुरू होताच घेणे अपेक्षित असते.

Rabi season in Yevla taluka Farmers confused days and dates of Palkhed rotation not fixed
Nashik Water Crisis: इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामाला बुरे दिन! शेतकऱ्यांसमोर मशागतीसह पाण्याचे संकट कायम

बैठकीत आवर्तनाची चर्चा होऊन पाणीवाटपाचे नियोजन केले जाते. यंदा राजकीय वातावरण पूर्णपणे गढूळ झाले आहे. लोकप्रतिनिधींना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी वेळ नसल्याने संबंधित विभागाला लोकप्रतिनिधींनी वेळ बदल्याण्याची विनंती केली आहे.

त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. यापूर्वी मंगळवारी ठरलेली बैठक लोकप्रतिनिधी नसल्याने रद्द झाली. आता शुक्रवारी (ता. २४) बैठक ठरली आहे, तीही होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दोन आवर्तने द्यावी लागणार

पावसाळ्याच्या शेवटी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता धरणात पाणी आहे. पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. पाणी वेळेवर सुटल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आवर्तनाचा मुहूर्त निश्चित होत नसल्याची टीका शेतकरी करीत आहेत.

धरण समूहातील उपयुक्त जलसाठा सहा हजार ३३३ दशलक्ष घनफूट असून, त्यातून पाहिल्या ३० दिवसांच्या आवर्तनासाठी एक हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे, तर दुसऱ्या २० दिवसांच्या आवर्तनासाठी एक हजार ४०० दशलक्ष घनफूट, असे एकूण तीन हजार २०० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी लागणार आहे.

पिण्यासाठी व इतर वापरासाठी जवळपास ५० टक्के पाणी शिल्लक राहणार असल्याने निफाड व येवल्यासाठी पालखेडमधून रब्बीसाठी दोन सिंचनाचे आवर्तन मिळावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

"जलस्त्रोत कोरडे झाल्याने व रब्बीच्या सिंचनाची परिस्थिती पाहता आतापर्यंत पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुरू होणे अपेक्षित होते. खरिपाने आर्थिक कंबरडे मोडले. आता रब्बीकडून आशा होत्या. मात्र, आवर्तन लांबल्याने त्या आशाही धूसर होत आहेत. इतर राजकारणात अडकून पडलेल्या लोकप्रतिनिधींना शेतकरी हिताची काळजी नसेल, तर शेतकरी त्यांना जागा दाखवून देतील."- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला

Rabi season in Yevla taluka Farmers confused days and dates of Palkhed rotation not fixed
Marathwada Water Crisis: मराठवाड्याची तहान भागणार, जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.