Vikhe Patil : राऊतांच्या डोक्यावर काही दिवसात परिणाम; महसूल मंत्री विखे-पाटील यांचे वक्तव्य

Radhakrishna vikhe Patil
Radhakrishna vikhe Patilesakal
Updated on

Nashik News : संजय राऊत यांना पोपटपंची करण्यासाठी ठेवले असून ते त्यांच्या पात्रतेपेक्षा अधिक बोलतं आहेत. त्यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त माणूस असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय आहे.

काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल, असे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी केले. (radhakrishna vikhe patil statement about sanjay raut nashik news)

चांदोरी (ता. निफाड) येथे नाशिक जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन ‌झाले. त्यानंतर शहरात आले असता माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे खासदार राऊत यांच्याबद्दल ते म्हणाले, त्यांच्याकडे पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांनी त्याचं पात्रतेत बोलावे. त्यापेक्षा अधिक बोलू नये. राऊत हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलतं आहे. राऊत यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यातचं शहाणपण आहे. त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल, हे माहीत नाही.

कर्नाटकात अँटी इन्कम्बन्सी

कर्नाटकाच्या निवडणुकीत भाजपला फार मोठा फटका बसला असे नाही. राज्यांचे स्थानिक विषय वेगळे असतात त्यामुळे केंद्र सरकारच्या कामगिरीशी कर्नाटक निवडणुकीचा निकाल जोडणे बरोबर नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Radhakrishna vikhe Patil
Sanjay Raut : न्यायालयाच्या निकालाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण : खासदार संजय राऊत यांचा दावा

कर्नाटक निवडणुकीवर अँटी इन्कमबन्सीचा परिणाम दिसून येत आहे. सीमा प्रश्न सोडविण्याची भाजपची भूमिका असून विरोधी पक्षाने आतापर्यंत यावर फक्त राजकारण केले आहे. सीमा भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्याने तेथील मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवला.

नाशिकमध्ये पहिला डेपो

नवीन वाळू धोरण राज्यात लागू झाले आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पहिला वाळू डेपो निफाडमधील चांदोरी येथे गोदावरी नदी किनारी उभारण्यात आला आहे. या डेपोचे अनावरण महसूलमंत्री विखे -पाटील यांच्या हस्ते झाले.

त्यावर बोलताना ते म्हणाले, वाळू माफीयागिरी मोडीत काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. थोडा वेळ लागेल परंतु यात नक्कीच यशस्वी होवू. वाळू धोरण अमलात आणण्यात वाळू माफिया अडचणी आणत आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होईल. महिन्याभरात प्रत्येकाला वाळू सहाशे रुपयात मिळेल.

Radhakrishna vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : वनजमीन अतिक्रमणाबाबतच्या कारवाईस स्थगिती; महसूल मंत्र्यांचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.