CM Eknath Shinde Group : कट्टर शिवसैनिक वसंत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

Vasant Patil and colleagues entering the party in the presence of Chief Minister Eknath Shinde.
Vasant Patil and colleagues entering the party in the presence of Chief Minister Eknath Shinde.esakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी परिसरातील कट्टर ठाकरे समर्थक अशी ओळख असलेल्या सेनेचे माजी पदाधिकारी वसंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रविवारी (ता. ३०) अधिकृत प्रवेश केला. शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे उपस्थित होते. (Radical Shiv Sainik Vasant Patil joins CM Eknath Shinde Group Nashik Political News)

श्री. पाटील यांनी यापूर्वी २००७ ला शिवसेनेच्या तिकिटावर तत्कालीन प्रभाग १०१ मधून उमेदवारी केली होती. त्या वेळी त्यांना अपक्ष संजय नवले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१२ ला त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या कन्या शुक्रवंती यांना उभे करून बंडखोरी केली. सुमारे तीन हजार मते घेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव घडवून आणला होता.

श्री. पाटील माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे ते खानदेश पट्ट्यातील आहेत. सध्याच्या प्रभाग ३१ मधून भाजप अथवा दोन्ही सेना यांच्यासाठी कसमादे आणि खानदेश पट्ट्यातील मतदारांची संख्या लक्षात घेता या भागातील उमेदवार देणे अपरिहार्य झाले आहे. पाटील शिंदे गटात गेल्यामुळे श्री. डेमसे हेही शिंदे गटात जातात की काय, अशी चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे.

Vasant Patil and colleagues entering the party in the presence of Chief Minister Eknath Shinde.
Nashik : जिल्हा बँकेची आजपासून वसुली मोहिम; 100 बडे थकबाकीदार रडारवर

आगामी निवडणुकीत शिंदे गटाशी भाजपची युती होणार, हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे पाटील यांना खानदेशी उमेदवार म्हणून शिंदे गटामार्फत उमेदवार केले जाऊ शकते. भाजपचे विद्यमान नगरसेवक भगवान दोंदे आणि पुष्पा आव्हाड यांची उमेदवारी गृहीत धरली तर मात्र भाजपमध्ये सध्या तयारीत असलेले माजी नगरसेवक संजय नवले, सुदाम कोंबडे, एकनाथ नवले, मदन डेमसे, जितेंद्र चोरडिया, पाथर्डीच्या माहेरवाशीण आणि कसमादेच्या सून डॉ. पुष्पा पाटील (नवले) या सर्वांचीच मोठी पंचायत होणार असून, कदाचित या सर्वांचाच मोठा रोष भाजपला अडचणीचा ठरू शकतो.

दुसरीकडे ठाकरे यांच्या सेनेतर्फे माजी नगरसेवक सुदाम डेमसे, अमोल जाधव, बाळकृष्ण शिरसाट, सुनील कोथमिरे आदी पर्याय असणार आहेत. एकंदरच पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे या प्रभागातील सर्वच राजकीय गणिताची गुंतागुंत झाली आहे, हे मात्र नक्की.

Vasant Patil and colleagues entering the party in the presence of Chief Minister Eknath Shinde.
Chhat Puja: उगवत्‍या सूर्याला अर्घ्‍य देत उत्‍तर भारतीयांनी केली छटपूजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.