Rahul Gandhi News : राहुल गांधींचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद; राजाराम पानगव्हाणे करणार ‘इंडिया’च्या स्वागत

congress Rahul Gandhi News
congress Rahul Gandhi NewsSakal
Updated on

Rahul Gandhi News : इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्त मुंबईत येत असलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा टिळक भवन येथे सत्कार होणार असून, त्यानंतर राहुल गांधी राज्यातील सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Rahul Gandhi interaction with office bearers of district nashik news)

सत्ताधारी भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीची गुरुवारी (ता. ३१) मुंबईत बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी व सोनिया गांधी मुंबईत येत आहेत. बैठकीनिमित्त अनेक वर्षांनंतर सोनिया गांधी व राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे दादर येथील पक्ष कार्यालयात राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

सत्कार सोहळ्यानंतर राहुल गांधी बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. बैठकीसाठी राज्यभरातील सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांसह प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत राहुल गांधी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्याशी संवाद साधत, पक्षाची स्थिती जाणून घेतील. तसेच, आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, आंदोलन, भूमिका याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

congress Rahul Gandhi News
Rahul Gandhi News : लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरी केलीय; राहुल गांधीचा मोठा दावा

पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईत तळ ठोकून

बैठकीनिमित्त पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबईत येत आहेत. ते पक्षाची बैठक घेतील. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवार (ता. ३०)पासूनच मुंबईत दाखल झाले आहेत. यात काही पदाधिकाऱ्यांवर पक्षातील नेत्यांनी पडद्यामागील कामांची जबाबदारी दिलेली आहे. काही पदाधिकारी गुरुवारी (ता. ३१) मुंबईला रवाना होतील.

समितीत पानगव्हाणे

बैठकीनिमित्त इंडिया आघाडीचे प्रमुख नेत्यांचे स्वागत करण्यासाठी तीन समित्या करण्यात आल्या आहेत. माजी खासदार संजय निरूपम यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या २८ जणांच्या समितीत राजाराम पानगव्हाणे यांना स्थान देण्यात आले.

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ए. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्बुल्ला आदींचे स्वागत या समितीकडून होणार आहे.

congress Rahul Gandhi News
Rahul Gandhi: राहुल गांधींचा सरकारी बंगला घेण्यास नकार, खासदारकी बहाल झाल्यावर पुन्हा मिळणार होता जुना बंगला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.