नाशिक : येथील वडाळागाव परिसरातील एका डेअरी फार्ममध्ये जनावरे अनधिकृत डांबून ठेवल्याची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी त्या ठिकाणी छापा (Raid) टाकून ११३ गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी चौघांविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Raid on dairy farm in Wadala rescued 113 animals Nashik Crime Latest News)
मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांना शनिवारी (ता. ९) रात्री खबऱ्याकडून वडाळागावात जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी मध्यरात्री वडाळ्यातील जेएमसीटी महाविद्यालयाजवळील जलाल डेअरी फार्मवर छापा टाकला. तेथे सुमारे ११३ जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवली होती.
यात ६९ गायी, तर उर्वरित गोऱ्हे व बैल आहेत. या साऱ्यांचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत आवेश कोकणी, जलाल आवेश कोकणी, नूर जलाल कोकणी, गुलाबगोस जलाल कोकणी यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
गोशाळांमध्ये रवाना
मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून सुटका केलेल्या जनावरांना उपचार व सुश्रृतेसाठी पेठ रोडवरील नंदिनी गोशाळा, विल्होळी येथील शरण संस्था व तपोवनातील कृषी गोसेवा ट्रस्टमध्ये दाखल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.