चाळीसगाव (जि. नाशिक) : येथील करगाव रस्त्यावरील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्यामागे अवैधरीत्या (illegal) सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) नाशिकच्या विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून सव्वा लाखांच्या रोकडसह एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. (raid on gambling den Charges filed against 18 persons Nashik Crime News)
याबाबत माहिती अशी, जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे आटोक्यात आणण्यात आणण्यासाठी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. शहरातील करगाव रस्त्यावरील इच्छापूर्ती मंदिराजवळच्या रुबाबदार हॉटेलच्या मागे पत्त्यांच्या जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाला. त्यानुसार, पथकाने रात्री एकच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता, १८ जण पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार ६२० रुपये रोख, दोन ५२ पत्त्यांचे कॅट, १२ हजार ५०० रुपये किमतीचे ११ मोबाईल व सुमारे सव्वा दोन लाखांच्या ११ मोटारसायकल असा एकूण ३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलिस हवालदार सचिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील गुलाब राजपूत (५६), सोमनाथ जाधव (३५), विशाल महाजन (२९), शंकर सोनार (५२), कुणाल पाटील (३३), सोनू गवळी (३६), राहुल चौधरी (२८), अजय भावसार (३३), कपिल पाटील (३४), आबा चौधरी (३३), हिंमत चौधरी (३८), भोजराज सावळे (२३) या बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार झालेल्या भय्या सूर्यवंशी, गंपू शेख, संजू घटी, सोनू उर्फ म्हश्या जाधव, महेश राजपूत व बापू मराठे (सर्व रा. चाळीसगाव) यांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्यासह त्यांच्या पथकातील रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शेख अहमद, मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे व मुकेश टांगोरे यांनी केली.
ग्रामीण भागात फोफावले अवैध धंदे
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांनी गुटखा विक्री वगळता सट्टा, मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यावर टाच आणल्याने हे सर्व धंदे सध्या बंद आहेत. त्यामुळे बहुतांश क्लब मालकांसह इतर अवैध धंदेवाल्यांनी ग्रामीण भागात आपले प्रस्थान बसवले आहे. करगाव रस्त्यावरील अड्ड्यावर झालेली कारवाई पाहता, अनेक खेड्यांमध्ये पत्त्यांचे क्लब, जुगाराचे अड्डे, गांजा, भांग, गावठी दारू विक्री यासारखे अवैध धंदे सुरु असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या अवैध धंद्यांवरही अशाच प्रकारच्या कारवाईची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.