Nashik News : त्र्यंबकेश्‍वरमध्ये लॉजिंगची झाडाझडती; नियमित तपासणी असल्याचा पोलिसांचा दावा

police
policeesakal
Updated on

नाशिक : तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये रविवारी (ता. २९) पोलिसांनी अचानक हॉटेल्स, लॉजिंगवरती छापामारी करीत कसून तपासणी केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, ही कारवाई नियमित असल्याचे त्र्यंबकेश्‍वर पोलिसांतर्फे सांगण्यात आले. (Raid on lodging in Trimbakeshwar police claim that its regular inspection Nashik News)

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. नाशिकपासून काही किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आणि रस्त्यालगतच्या काही लॉजवरही अवैधरीत्या व्यवसाय चालत असल्याच्या कारणावरून रविवारी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविली.

या मोहिमेमुळे हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांत घबराट पसरली. पोलिसांचा मोठा फौज फाटा तपासणी करीत असल्याने शहरातही उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी ही नियमित तपासणी असल्याचे सांगत या वेळी मात्र ती व्यापक प्रमाणावर राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

police
Nashik News : शॉर्टसर्किटमुळे घरगुती सामान जळून खाक

त्र्यंबकमध्ये शनिवारी आणि रविवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमीयुगल हेही मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरकडे येतात. त्यामुळे लॉजिंग व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होते की नाही, याबाबत पोलिसांनी तपासणी केल्याचे समोर येत आहे.

दुसरीकडे नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला अनेक लॉज व हॉटेल झालेली आहेत. यातील काही लॉजमध्ये सर्रास जोडपे, तरुण-तरुणी येत असल्याची पोलिसांची माहिती आहे, त्यादृष्टीनेही मोहीम राबविण्यात येत असल्याचे समजते.

police
Muslim Marathi Sahitya Sammelan | मुस्लिमांनो, फूट पडू देऊ नका! : हुसेन दलवाई यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.