मालेगावला बायोडिझेल पंपावर छापा; पोलिसांची मोठी कारवाई

malegaon
malegaon esakal
Updated on

नाशिक : मालेगावमध्ये (mallegaon) नाशिक ग्रामीण पोलिसांची (Nashik Rural Police) मोठी कारवाई केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या (congress ex mla) माजी आमदारांचा भाऊ व हा अनधिकृत बायोडिझेल पंप (biodiesel pump) चालवत होता. यावर ग्रामीण पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे.

माजी आमदाराच्या भावाला पोलीसांचा दणका

नाशिक मालेगाव रस्त्यावर बिनधास्तपणे हा पंप सुरू होता. माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ व माजी आमदार आसिफ शेख यांचे काका जलील शेख हा अनधिकृत पंप चालवत होता. जलील शेखच्या मालकीच्या हॉटेलमागे पत्र्याच्या शेडमध्ये हा अनधिकृत डिझेल पंप उभारण्यात आला होता. पंपावर मिळणाऱ्या डिझेल पेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने बायोडिझेल विकला जात होता. पोलीसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केल्याचे समजते. ज्यावेळी पोलीसांनी छापा टाकला, त्यावेळी २५ हजार लिटर बायो-डिझेलची टाकी व ५ हजाराच्या ३ टाक्या व त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स होते. ते बायो-डिझेलसाठी वापरले जात होते. या कारवाईत पोलीसांनी सर्व साहित्य सील केले असून मालेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

malegaon
येवला प्रांताधिकाऱ्यांची महिला तलाठीकडे शरीरसुखाची मागणी

मागील वर्षी बायोडिझेलचा पंप स्थापन करून त्या नावाखाली इतर भेसळयुक्त इंधन विक्री करण्याचा सपाटा जिल्ह्यातील काही पंपचालकांनी सुरू केला होता. बायोडिझेलच्या नावाखाली मालेगाव तालुक्यात १८ ते २० पंप सुरू झाले होते. तेथे बायोडिझेलच्या नावाखाली इतर भेसळयुक्त इंधन विकले जात असल्याची पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनची तक्रार होती. जिल्हा प्रशासनाने एकाही बायोडिझेल पंपाला परवाना दिलेला नसतानाही त्या नावाखाली इंधनविक्री सुरू होती.

malegaon
परदेशातील बाजारपेठेतील प्रश्‍न कांदा उत्पादकांच्या मुळावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()