Nashik Crime News : स्पा, मसाजमधील अनैतिक धंद्यांवर छापामारी

crime news
crime newsesakal
Updated on

नाशिक : शहरात काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे पेव फुटले होते. परंतु, पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती.

मात्र, नवनियुक्त पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, विशेष पथकांनी शहरातील स्पा, मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांवर छापामारी सुरू केली आहे. पंचवटी हद्दीत कारवाई करीत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, दोन महिलांची सुटका केली. (Raids on unethical businesses in spas massages Nashik Crime News)

शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या सूचनेनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्यांची स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातर्फे पंचवटी पोलिसांच्या हद्दीत छापा टाकून कारवाई करण्यात आली.

पेठ रोड येथील मधुबन अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर अनैतिक देहविक्रीय सुरू असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शनिवारी (ता. १४) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

crime news
Solapur Crime News: नववर्षात शहरातून १३ दुचाकींची चोरी

या ठिकाणी दोघा पीडित महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून स्वतःच्या फ्लॅटमध्येच त्यांना ग्राहक पुरविण्यात येत. तिथे देहविक्रीय व्यापारासाठी संशयित महिला पैसे घेताना सापडली. महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित उषा प्रमोद भागवत (४२, रा. भागवत गल्ली, देवळाली गाव), सरला शेखचंद बोकेफोडे (३३, रा. मधुबन अपार्टमेंट, पेठ रोड) या दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Nagpur Crime News: ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()