Nashik News : पांजरपोळमध्ये आश्रयासाठी असलेल्या १११ उंटापैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून उरलेल्या उंटांना परत नेण्यासाठी राजस्थानहून निघालेले रायकांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. (Raika team entered Nashik to transport camels news)
आता जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या उंटांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती पांजरपोळ संस्थेतर्फे देण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तस्करीच्या संशयाने जात असलेल्या उंटांची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती.
जिल्हा प्रशासनाने त्या उंटांना ताब्यात घेऊन संगोपनाची जबाबदारी पांजरपोळ संस्थेला दिली होती. हजारो किलोमीटर लांब वरून पायपीट करून आलेले उंटांची झालेली उपासमार आणि सहन न झालेले महाराष्ट्राचे वातावरण यामुळे अत्यवस्थ असलेले तब्बल बारा उंटांचा मृत्यू पांजरपोळ येथे झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणी मित्रांसह पांजरपोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते.
यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळ येथे दाखल झाले आहेत. आता उंटांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. येत्या दोन दिवसात उंट राजस्थानात परत जाणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.