नांदगाव (जि. नाशिक) : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी (Railway jobs) लावून देण्याचे आमिष दाखवून एक कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी हनुमाननगर येथील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) अटक केली. त्याचे अन्य तीन साथीदार अद्यापही फरारी आहेत.
नोकरीला लावून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या या सायबर चालकासह अन्य तीन साथीदारांनी फसवणूक केलेल्या तरुणांना सलग चार वर्षे झुलवत ठेवले. शिवाय पोलिसांत गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र, फसवणूक झालेल्या तरुणांनी पैशांसाठी तगादा लावल्यावर त्यांना आपल्या पत्नीच्या अंगावर हात टाकला म्हणून गुन्हा दाखल करू, असा पवित्रा सूर्यवंशी याने गेल्या वर्षी घेतला होता. त्यामुळे तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हापासून पोलिसांच्या तपासकार्यात आज प्रगती झाली व सूर्यवंशी याला अटक झाली. सूर्यवंशी मालेगावच्या सोयगाव भागातील पवननगरचा रहिवासी असून, तो नांदगाव येथील येथील हनुमाननगर भागात सायबर कॅफे चालवतो.
याबाबत चेतन शिवाजी इघे व अन्य तरुणांचा विश्वास संपादन करीत मध्य रेल्वेत तिकीट तपासणीस, गेटमन आदी पदांवर नोकरीला लावून देण्याच्या आमिषापोटी एक कोटी १५ लाख रुपये उकळले होते. तसेच, बनावट सही व शिक्के असलेले नियुक्तीपत्र देऊन फिर्यादी व साक्षीदारांची वैद्यकिय तपासणी करून मेडिकल सर्टीफिकेट (Medical Certificate) दिले होते. रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी या प्रकरणातील संशयित आरोपी ज्ञानेश सूर्यवंशी (रा. पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) याच्या सायबर कॅफेवर जात असे. तसेच, सहआरोपी सतीश बुच्चे (रा. घर नं. ९, सदगुरू हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे), संतोष पाटील (रा. वंडरसिटी, कात्रज, ता., जि. पुणे) यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर आरोपींनी बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्तीपत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई, बाँबे हॉस्पिटल, मुंबई आणि राणी मुखर्जी हॉस्पिटल उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाल्याबाबतचे बनावट सही व शिक्के असलेले मेडीकल सर्टिफिकेट दिले होते.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, हवालदार भारत कांदळकर, पोलिस नाईक अनिल शेरेकर, सुनील कुऱ्हाडे, सागर कुमावत, पोलिस कॉन्स्टेबल संदीप मुंढे यांच्या पथकाने ज्ञानेश सूर्यवंशी (रा. गणपती मंदिर, पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) यास अटक केली.
विश्वास संपादन करून फसवणूक
स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष संशयितांकडून दाखविण्यात आले. त्याला तरुण बळी पडत गेले. हा प्रकार चार वर्षापूर्वी घडला. स्पर्धा परीक्षा देण्यापेक्षा रेल्वेत तिकीट तपासणीस, गेटमन अशा पदावरील नोकऱ्या ओळखीमधून मिळवून देतो. आपल्या वागणुकीने ज्ञानेश्वरने या तरुणांचा विश्वास संपादन केलेला असल्याने नोकरी मिळण्याच्या तरूण ज्ञानेश्वर व त्याच्या साथीदारांनी बनवलेल्या जाळ्यात अडकत गेले. प्रत्येकाकडून १२ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंत रकमा नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने वैयक्तिक भेटीत घेतल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.