Railway: रेल्वेचे खासगीकरण होणार का? वाचा काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव

Latest Nashik News: सामनगाव रोडवरील सुरक्षा दलाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात संचलन झाले.
Railway: रेल्वेचे खासगीकरण होणार का?  वाचा काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव
Updated on

Latest Nashik News: गरीब, सामान्यांसाठी चांगली सेवा असा स्वच्छ आणि स्पष्ट रेल्वेचा संकल्प आहे. त्यामुळे रेल्वे सेवेचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न ही निव्वळ अफवा आहे. देशात रेल्वे आणि लष्कर याविषयी देशात राजकारण होऊ नये, असे आवाहन रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांनी केले.

या वेळी नाशिक रोड सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ३५ कोटीची घोषणा केली. तसेच जागा देणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. रेल्वे स्थानकावरील अडचणी समजून घेतल्या.

Railway: रेल्वेचे खासगीकरण होणार का?  वाचा काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव
Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या 'या' गाड्या दादरपर्यंत धावणार

रेल्वे सुरक्षा दलाच्या ४० वा स्थापना दिनानिमित्त नाशिक रोडला सामनगाव रोडवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात देशातील विविध भागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुरक्षा दलाच्या ३२ अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामनगाव रोडवरील सुरक्षा दलाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात संचलन झाले.

रेल्वेमंत्र्यांनी परेड पाहणी केली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मीना, कमांडिंग ऑफिसर जतिन मधुराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचलनात रेल्वे सुरक्षा दलाच्या विविध तुकड्या सहभागी झाल्या. सुरक्षा दलाचे महानिर्देशक मनोज यादव, आयजी सुरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दलासाठी सुधारित कायद्याची माहिती देणाऱ्या ॲप्लिकेशनचे आणि पुस्तिकेचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले.

Railway: रेल्वेचे खासगीकरण होणार का?  वाचा काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित

तसेच पदक विजेत्यांचा गौरव झाला. यात अतिरिक्त संचालक एस. सी. पारधी, मध्य रेल्वेतील उपनिरीक्षक प्रदीप लोखंडे आदींसह देशातील ३३ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

वैष्णव म्हणाले, गेल्या ६० वर्षात २० हजार किलोमीटर विद्युतीकरण होते ते १० वर्षात ४० हजार किलोमीटर झाले. अमृत भारत, कवच, वंदेभारत, अशा अनेक उपक्रमातून नवे तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि मनुष्यबळ या त्रिसूत्रीचा वापर करून रेल्वे सेवेचा दर्जा उंचावला आहे. १२, ५०० जनरल रेल्वे डब्याचे काम सुरू आहे. ४०० रुपयात १ हजार किलोमीटर प्रवास करता येईल असे नियोजन आहे. असे असताना खासगीकरण करण्याची अफवा पसरवली जाते हे चुकीचे आहे.

Railway: रेल्वेचे खासगीकरण होणार का?  वाचा काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव
Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.