Nashik Monsoon Update : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरासह तालुक्याच्या पश्चिम घाटपट्टयासह शहर आणि कसाराघाट परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असून एकाच दिवसात ५० मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
घोटी इगतपुरी शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाबरोबर दाट धुकेही आल्याने वर्दळीचा महामार्गही मंदावला आहे.
आजअखेर तालुक्यात १ हजार ३३४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. (Rain continues in Igatpuri Taluka 50 mm of rain recorded in single day nashik monsoon update news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तालुक्यातील भात लागवडीच्या कामांना वेग आला असून काही भागातील शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधारेने शहराच्या विविध भागात पाणी तुंबले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. अति पावसाच्या भागात पावसाने दुसऱ्या टप्यांत जोरदार मुसंडी मारली आहे.
घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, अवळखेड, कारवाडी, चिंचलेखैरे तसेच पूर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली, मुकणे जानोरी, नांदगाव, वाडीवऱ्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली वैतरणा, टाकेद, साकूर, शेणित, देवळे, खैरगाव, आंबेवाडी, इंदोरे, वासाळी, खेड, बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी व आदी भागात पावसाने दमदार बरसात सुरू ठेवली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.