Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 ते 48 तासांमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज

Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 ते 48 तासांमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज
esakal
Updated on

Nashik Rain Update : रोहिणी अन मृग नक्षत्र कोरडे गेल्याने चातकासारखी वाट पाहणाऱ्या कृषीपंढरी नाशिक जिल्हावासियांसाठी खुशखबर आहे. इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे येत्या २४ ते ४८ तासात मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

तसेच जिल्ह्यातील घाट विभागात सोमवारी (ता. २६) आणि मंगळवारी (ता. २७) जोरदार पावसाची शक्यता केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. (rain update Monsoon arrival forecast in the district in 24 to 48 hours nashik news)

हवामानशास्त्र अभ्यासकांशी संवाद साधल्यानंतर राधानगरी (जि. कोल्हापूर) भागात सकाळपासून पाऊस सुरु झाला असून सांगली भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरवात झाल्याची माहिती उपलब्ध झाली.

तसेच सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात वळीव पाऊस झाल्याचे सांगत नाशिक जिल्ह्यातील मॉन्सूनच्या आगमनाच्या इगतपुरीच्या केंद्राच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे.

अभ्यासकांच्या माहितीनुसार आता मॉन्सूनचे आगमन झाल्यावर चार ते पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच १५ जुलैच्या आसपास, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यात चांगला पाऊस होऊन सप्टेंबरमध्ये राज्यातील धरणे भरण्यास मदत होईल, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 ते 48 तासांमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज
Nashik Rain Update : व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाळी वस्तूंची बाजारपेठ मंदावली

दरम्यान, पक्षी मेच्या सुरवातीला घरटी बांधण्यास सुरवात करतात. यंदा मात्र मेच्या अखेरच्या आठवड्यात पक्ष्यांनी घरटी बांधण्यास सुरवात केल्याने मॉन्सूनच्या आगमनाला एवढा विलंब होईल, असे संकेत निसर्गातून मिळाल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले.

पेरणीची घाई करू नये

खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी ३ ते ४ दिवस पेरणीयोग्य म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर सुरवात करावी. कमी पावसावर पेरणीची घाई करू नये, असा सल्ला इगतपुरीच्या केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २४) सोमवारपर्यंत (ता. २६) हलक्या, तर मंगळवारी (ता. २७) व बुधवारी (ता. २८) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. २८ जूनपर्यंत जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल २८ ते ३३ आणि किमान १९ ते २४ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग तासाला २३ ते २५ किलोमीटर राहील, असे अंदाज केंद्रातर्फे वर्तविण्यात आले आहेत.

Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 ते 48 तासांमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज
Rain : राज्यात मॉन्सूनची प्रगती संथच! पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()