Nashik Rain News : इगतपुरीत पावसाची जोरदार हजेरी; धुके, ढगाळ वातावरणाने पर्यटकांची गर्दी

tourists will increase as water falls will start igatpuri nashik news
tourists will increase as water falls will start igatpuri nashik newsesakal
Updated on

Nashik Rain News : गेल्या पाच- सहा दिवसांपासून तालुक्यात जोरदार पावसाला सुरवात झाल्याने तालुक्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ होत आहे. या पावसामुळे ठिक-ठिकाणी डोंगर उतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढणार आहे.

शनिवारी (ता. १) व रविवारी विकेंडला भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा धरण, दारणा धरण, भाम धरण या ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. (rain update tourists will increase as water falls will start igatpuri nashik news)

तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर...निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरून दिलेली वनराई...मंद मंद धुंद करणारा पाऊस...क्षणात पालटणारे धुकेमय, वातावरण...घनदाट वृक्षांची छाया...मुक्तहस्ते निर्मित धबधबे...खोल खोल दऱ्या...हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी जनावरे...किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे...

रानफुलांचा मंद मंद सुगंध...शेकडो पर्यटकांचे असे अनेकानेक अंगांनी नटून थटून स्वागत करणारा भावली धरण परिसर आहे. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या काळात हजारो पर्यटक भेट देऊन आनंद घेतील.

कसारा घाटातील विहिगाव (ता. शहापूर जि. ठाणे ) येथील ‘अशोका धबधबा’ हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. नाशिक आणि मुंबई परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी ‘अशोका’ धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

tourists will increase as water falls will start igatpuri nashik news
Sakal Special : अंडी, चिकनपेक्षा भारी मोहाचे लाडू, गुलाबजाम; बचतगटांचा अभिनव उपक्रम

पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबईतल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

धबधब्यावर होणार गर्दी

अप्पर वैतरणा धरण २६ किमी आहे. या ठिकाणी वीज निर्मितीचा मोठा प्रकल्प आहे. येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी नाशिक, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात.

भंडारदरा - ३५ किमी, दारणा धरण ३० किमी, खोडाळा - ३० किमी, सुंदरनारायण गणेश मंदिर देवबांध - ३५ किमी याशिवाय कुलंग, अलंग, मलंग, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी, रंधा धबधबा या ठिकाणापासून जवळच आहे. कसारा घाटा जवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे, असे सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके अनुभवण्यासाठी विकेंडला गर्दी होणार आहे.

tourists will increase as water falls will start igatpuri nashik news
Masharashtra Krushi Din 2023 : अन्नदाता सुखी भव! पण कधी? शेती विरोधी धोरणाने खोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.