MGNREGA News : दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा रोजगार हमी योजना विभागातर्फे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत रोजगार हमी योजनेच्या मजूर संख्येत मोठी वाढ झाली होती.
मात्र, गत आठवड्यापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः पश्चिम पट्ट्यात पावसाने हजेरी लावल्याने रोहयोवरील मजुरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गत आठवड्यात मजुरांची संख्या ही ९० हजार होती, तर सोमवारी (ता. १७) ही संख्या १४ हजार ५९६ वर आली आहे. (Rains reduce labor on MGNREGA Within week number came from 90 thousand to 15 thousand nashik)
यंदा पाऊस लांबल्याने शेतातील कमी झालेली कामे, रोजगार हमीमध्ये मजुरीचे वाढलेले दर, यंदा राबविण्यात येत असलेली शासन आपल्या दारी योजना, जलयुक्त शिवार योजनेतील शोषखड्डे, तसेच जिल्हा परिषदेचा मिशन भगीरथ प्रयास अभियान यामुळे रोहयोवरील मजुरांची संख्या वाढलेली होती.
रोहयोतून वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक लाभाची कामे करण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये घरकूल, शोषखड्डा, स्वच्छतागृह, विहीर, फळबागा आदी कामांचा समावेश होतो. सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये रोपवाटिका, वृक्ष संगोपन आदी कामांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत, कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग अशा विविध यंत्रणांमार्फत ही कामे करण्यात येतात. दुष्काळी स्थितीत राज्यात सर्वाधिक मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेतून कामे मिळतात.
रोहयोतून सर्वाधिक कामे जलसंधारणाची झालेली आहेत. रोजगार हमी योजनेतील कामांची व्याप्ती वाढली असून, योजनेच्या अंमलबजावणीत मोठी पारदर्शकता आणण्यात आलेली आहे. गेल्या महिनाभरापासून शासन आपल्या दारी, जलयुक्त शिवार योजना, तसेच भगीरथ प्रयासमुळे रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या उपस्थितीत मोठी वाढ झाली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
५ ते १३ जुलै दरम्यान, ग्रामपंचायतींची एक हजार ८१०, तर अन्य यंत्रणांची १७५ कामे सुरू होती. यात एकूण ९० हजार २१४ मजूर काम करत होते. मात्र, गत आठवड्यापासून लांबलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे.
जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये विशेषतः आदिवासी तालुक्यांमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले आहे. याशिवाय इतर काही तालुक्यांमध्येही काही प्रमाणात पाऊस झाला आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा असली तरी, पेरण्याजोगा पाऊस झालेला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात पेरण्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे रोहयावरील मजुरांमध्ये घट झाली आहे. १७ जुलैअखेर जिल्ह्यात एक हजार ३८५ ग्रामपंचायतींमध्ये ६१९ कामे सुरू असून, यात १४ हजार ५९६ मजूर काम करत आहे. पावसाचा जोर जसजसा वाढेल, तसतशी कामांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय मजुरांची संख्या
बागलाण (१,४१०), चांदवड (५५८), देवळा (३२५), दिंडोरी (८८०), इगतपुरी (४०२), कळवण (१,०३८), मालेगाव (२,१८१), नांदगाव (१,६११), नाशिक (१७७), निफाड (१,६०९), पेठ (६७५), सिन्नर (८१३), सुरगाणा (१,९०४), त्र्यंबकेश्वर (७८९), येवला (२२४)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.