लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यांच्या द्राक्षपंढरीत सध्या परराज्यांतील व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. शेतकरी वर्ग आपल्याला जो योग्य भाव देणारा द्राक्षव्यापारी शोधत आहे. बहरलेल्या द्राक्षबागा खाली करण्यावर भर देत आहे. त्यातच बेदाणा व्यावसायिकांचीही बेदाणा (Raisins) निर्मितीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. त्यासाठी शेड उभारणींची लगबग सुरू आहे.
द्राक्षपंढरीत द्राक्षखरेदी करण्यासाठी व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर आगमन होत असल्याने कामगारांच्या रोजगाराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट, बदलत्या हवामानांचा सामना करत आता काही अंशी दिंडोरी तालुक्यातील द्राक्षकाढणीला सुरुवात झाली आहे. आता द्राक्षे खरेदीसाठी विविध राज्यांतून व्यापारी वर्ग दाखल झाल्याने शेतकरींच्या द्राक्षांच्या भावाबाबत आशा उंचावल्या आहेत. द्राक्षे काढणीसाठी मजूर मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे मजुरांना हक्काचे काम मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. द्राक्ष मण्यांपासून बेदाणा निर्मितीला प्रारंभ होत असून बेदाणा व्यावसायिकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
बेदाणा निर्मितीची लगबग
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव, करजंवण, वरखेडा, दिंडोरी, परमोरी, कोराटे, सोनजांब, दिंडोरीचा पश्चिम पट्टा तसेच कादवा काठच्या परिसरात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. या गावांना द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी आवश्यक वाहतुकीच्या सोयी सुविधांसह व्यापाऱ्यांची उपलब्धी खेडगाव, पिंपळगाव, वणी, वडनेरभैरव येथे आहे. त्यामुळे वाहतुकीचे साधने, कामगारांची रेलचेल यामुळे द्राक्षे पंढरी गजबली आहे. सध्या द्राक्षखरेदीसाठी कोलकता, गोरखपूर, बनारस, पटणा, अलाहाबाद, गुजरात येथील व्यापारी वर्ग दाखल होत आहे. बेदाणा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक शेड उभारणीसाठी बांबू, बारदाण, सुतळी, शेडनेट, ताडपत्री, गंधक व बेदाणा प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे साधने खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. शेतकरी सध्या द्राक्षमणी खरेदी करून बेदाणा व्यवसायांकडे वळू लागले आहे.
कोट
"मागील हंगामात कोरोनांमुळे आम्ही बेदाणा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आत कोरोनाचे वातावरण बदलत गेल्यामुळे बेदाण्याला चांगली मागणी वाढली होती .सध्या तरी शेतकरी वर्गाकडे बेदाणा शिल्लक नाही. त्यामुळे यंदा असंख्य शेतकरी बेदाणा व्यवसाय करण्यावर भर देत आहे."
- शिरीन काजी, बेदाणा व्यावसायिक लखमापूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.