Raisin Market News : नाशिकचा बेदाणा देश-परदेशात ग्राहकांना हवाहवासा! २ हजार टनाची निर्यात

raisins
raisinsesakal
Updated on

Nashik Raisin Business : नाशिकचा बेदाणा देश आणि परदेशातील ग्राहकांना हवाहवासा वाटतोयं. द्राक्ष पंढरीत यंदा ३५ हजार टन बेदाण्याचे उत्पादन अपेक्षित असून सरासरी शंभर रुपये किलो भावाचा विचार करता, ३५० कोटींच्या बेदाण्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आतापर्यंत फेब्रुवारी-मार्चमध्ये २ हजार टन बेदाण्याची निर्यात झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ( Raisins of Nashik desired by customers in country and abroad Export of 2 thousand tons nashik news)

देशांतर्गत केरळ, आसाम, उत्तरप्रदेश, ओडीशामध्ये, तर परदेशात इंडोनिशिआ, व्हिएतनाम, युक्रेन, रशिया, युरोप, ब्राझील, कॅनडा, बांगलादेश, श्रीलंका, दुबई, सौदी अरेबियामध्ये जिल्ह्यातून बेदाणा पाठवला जात आहे.

बेदाणा तयार करण्याचा हंगाम सुरु असला, तरीही बेदाण्याची विक्री वर्षभर चालते. सांगली, सोलापूर आणि कर्नाटकमधील विजापूर भागामध्ये विशेषतः बेदाण्याच्या उत्पादनासाठी द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.

पश्‍चिम महाराष्ट्रातून हिरवा बेदाणा ९० ते १९० आणि पिवळा बेदाणा १३० ते १६० रुपये किलो भावाने व्यापारी विकत घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात यंदा द्राक्षांच्या सुरवातीच्या हंगामात बेदाण्याच्या उत्पादनाचा वेग काहीसा मंद होता.

त्यामुळे गेल्यावर्षी याच कालावधीत ७५ ते ९० रुपये भावाने खरेदी झालेल्या पिवळ्या बेदाण्याला आता ९० ते १३० रुपये असा भाव मिळत आहे. याशिवाय काळ्या वाणाच्या बेदाण्याला ७० ते ११०, तर तपकिरी रंगांच्या बेदाण्याला ३० ते ५५ रुपये असा भाव सध्या मिळत आहे.

जिल्ह्यात यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी होईल, असे सुरवातीच्या काळात वाटत होते. मात्र अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीमुळे द्राक्षांचे नुकसान झाले आणि घरगुती वापरासाठी द्राक्षांच्या खरेदीकडील व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला.

परिणामी, बेदाण्याच्या उत्पादनाचा विचार शेतकऱ्यांनी सुरु केल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे उत्पादन १० हजार टनाने अधिकचे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी सर्वसाधारपणे २५ हजार टन बेदाण्याची जिल्ह्यातून खरेदी झाला होता. बेदाण्याची निर्यात प्रामुख्याने जहाजाने, तर देशांतर्गत ट्रकने बेदाणा पाठवला जातो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

raisins
ZP Recruitment : जिल्हा परिषदेत 2 हजार जागांची मेगा भरती! मेच्या पहिल्या आठवड्यात भरतीची जाहिरात

बेदाणा सात्त्विक पदार्थ

बेदाण्याचे आयुर्वेदिक महत्त्व असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली. बेदाणा हा सात्त्विक पदार्थ असून खीर आणि दुधाच्या पदार्थांमध्ये बेदाणा वापरला जातो असे सांगून ते म्हणाले, की गरम-शिजवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये पिवळा बेदाणा वापरला जातो.

गरम पदार्थांव्यतिरिक्त काळ्या बेदाण्याचा वापर केला जातो. चिवड्यात ड्रायफ्रूटच्या स्वरूपात बेदाणा वापरण्यात येतो. पिवळा बेदाणा मांसवर्धक, शक्तिवर्धक, पोटातील वात कमी करणारा, उष्णता कमी करणारा, लघवीची जळजळ कमी करणारा आहे.

काळा बेदाणा पोट साफ करतो. यकृतासाठी चांगला असतो. कावीळ झालेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. काळे बेदाणे, खजूर आणि कोकमचे सरबत पिल्याने उष्णता कमी होते. पोटाच्या आजारांसाठी उपयुक्त ठरते. लहान मुलांना शौचाचा त्रास असल्यास प्यायला दिले जाते.

"नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने निर्यात आणि खाण्यासाठी द्राक्षांचे उत्पादन करण्याकडे कल असतो. त्यानंतर तिसरा पर्याय म्हणून बेदाण्याचा विचार केला जातो. त्यामुळे द्राक्षांच्या हंगामाला सुरवात झाल्यावर गेल्यावर्षीइतक्या बेदाण्याचे उत्पादन जिल्ह्यात होईल का? असा प्रश्‍न तयार झाला होता. मात्र आता बेदाण्याचे उत्पादन वाढले असले, तरीही देश आणि परदेशात चांगली मागणी असल्याने गेल्यावर्षीपेक्षा अधिकचा भाव बेदाण्याला मिळत आहे."

- शितल भंडारी, अध्यक्ष, बेदाणा व्यापारी असोसिएशन

raisins
Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने घातला धुडगूस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()