सिडको (नाशिक) : नाशिक महापालिका निवडणुकीच्या (nashik muncipal corporation election) पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) जोरदार कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) गुरुवारी (ता.२३) नाशिकच्या (nashik) सिडको मार्गाने अंबड लिंक रोडवर एका कार्यक्रमासाठी येत आहेत. परंतु, त्यांच्यासाठी हा प्रवास खडतर असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. तशा प्रकारची चर्चादेखील सध्या चर्चिली जात आहे.
राज ठाकरेंच्या 'बालेकिल्ल्यातच' प्रवास खडतर !
तसे बघितले तर सिडको व अंबड हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यातून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना मागील दोन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत सातत्याने सर्वाधिक मते मिळाली आहेत. नाशिक पश्चिममध्ये शिवसेना- भाजप युतीचे विधानसभा उमेदवार सीमा हिरे या आमदार म्हणून निवडून आल्या. याच परिसरात सर्वाधिक नगरसेवक सध्या तरी शिवसेनेचे असून, नगरसेविका सुवर्ण मटाले या मनपा सिडको प्रभाग सभापती म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेचे १५, भाजपचे ८ व राष्ट्रवादी काँग्रेसचा नावाला केवळ एकच नगरसेवक आहे. तर माकप, काँग्रेस व मनसेला मात्र येथे साधा भोपळाही फोडता आला नाही. हे त्या पक्षांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्यातच भरीस-भर म्हणजे शिवसेना पक्षाने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना महानगरप्रमुख हे पद बहाल केल्याने सिडको म्हणजे सध्या शिवसेनेकरिता सत्तेचे केंद्रबिंदू बनू पाहत आहे. नारायण राणे यांच्या विरोधात श्री. बडगुजर यांनी राज्यात पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल केला, तर भाजप कार्यालयावर युवा सेना जिल्हाधिकारी दीपक दातीर यांनी हल्ला केल्याने सध्या ते जोरदार चर्चेत आहेत. एकेकाळचे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अनिल मटाले सध्या तरी भाजपवासीय आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर विनायक पांडे, छत्रपती घराण्यातील स्नुषा सोनाली राजे पवार आदींचा रहिवास याच सिडको भागात आहे. आता हे सर्व नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्टिव्ह झाले आहेत.
रस्तावर खड्डे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी सिडकोमार्गे अंबड परिसरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. परंतु, ते ज्या मार्गाने येत आहेत, त्या मार्गावर सध्या उड्डाणपुलासाठी माती परीक्षण काम सुरू असल्याने रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. तर माऊली लॉन्स ते प्रणव स्टॅम्पिंग दरम्यान झाडे तोडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने ठाकरे यांचा हा प्रवास खड्डेमय मार्गाने खडतर पद्धतीने होणार असल्याचे चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.