Raj Thackeray : शहर दत्तक घेतले, त्याचे काय झाले? राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Devendra Fadnavisesakal
Updated on

Nashik News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबाबत अनिश्चितता असली तरी राजकीय पक्षाकडून मात्र तयारी सुरू झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मागील टर्ममध्ये सत्तेत असलेल्या भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. (raj thackeray statement about devendra fadnavis nashik city adoption nashik news)

नाशिक शहर दत्तक घेतले, त्याचे काय झाले? असा उलट सवाल करताना मनसेच्या काळात जी कामे झाली, त्यानंतर कधीही झाली नाही, असा दावा करत पुन्हा निवडणुकांमध्ये मनसेची विकासाची ब्ल्यू प्रिंट आणण्याचे संकेत दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांची संकेत त्यांनी दिले. या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरताना एकीकडे संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. तर दुसरीकडे मनसेच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये झालेल्या कामांची जंत्री पुन्हा मतदारांसमोर मांडून मनसे व इतर पक्षाचा फरक स्पष्ट करा, अशी प्रश्नावली त्यांनी मतदारांसमोर ठेवली आहे.

नाशिकमध्ये संघटना संदर्भात बोलताना ते म्हणाले, नाशिकमध्ये पक्षाची बांधणी करण्यासाठी आलो आहे. पक्षांमधील जे हेवेदावे आहे ते दूर केले जातील. मी मुंबईला गेल्यानंतरही पक्ष दिसेल. निवडणुकीत केलेली कामे लोकांपर्यंत पोचली तरी खूप झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray : हे निर्णय देशाला परवडणारे नसतात; राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले!

नवीन मुद्दे येतील, आमच्या काळात जेवढी कामे झाली तेवढी कामे त्या आधीच्या सत्ताकाळात व त्यानंतरच्या सत्ताकाळातदेखील झाली नाही. ज्यांनी शहरे दत्तक घेतली त्यांचं काय झालं, त्यांना कोणी प्रश्न विचारात नाही. असे सांगताना ठाकरे यांनी भाजपशी दोन हात करण्याची तयारी केली आहे.

मनसे-भाजप युतीवर फुली

मध्यंतरीच्या काळात भाजप व मनसेची युती होऊन स्थानिक स्वराज्य संस्था लढविल्या जातील, असे बोलले जात होते. परंतु राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढविल्याने युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर मनसेला सोबत घेतल्यास मुंबईत उत्तर भारतीय मतदार दुरावेल, अशी भीती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. हेदेखील युती न होण्यामागचे एक कारण सांगितले जाते.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray : त्र्यंबकेश्वरच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.