पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात

Raj-Thackeray
Raj-Thackeraygoogle
Updated on

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असून, १६ ते १८ जुलैदरम्यान निवडणूक व पक्षांतर्गत बांधणीसंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची ते चर्चा करून निर्णय घेणार आहेत. (Raj Thackeray visit to Nashik from 16th to 18th July political news)

जानेवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या वतीने विकासकामांच्या उद्‌घाटनाचा बार उडविला जात आहे. शिवसेनेने शंभर प्लस जागा मिळविण्यासाठी आतापासूनच संघटना पातळीवर बांधणी करताना सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एकेकाळी महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेनेदेखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप व मनसेची युती होईल की नाही, याबाबत अद्याप निश्चित नसले तरी मनसेकडून स्वतंत्ररीत्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Raj-Thackeray
पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला

निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षांतर्गत निर्माण झालेले वाद संपण्याचे मोठे आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत नाशिकमध्ये मनसेला चांगले वातावरण असतानादेखील ज्येष्ठ नेत्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा ऐरणीवर आणला जात नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात येऊन डागडुजी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र ज्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या त्यांना पदावरून हटविण्यात आले, यावरून मनसेमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे स्पष्ट झाले. पक्षांतर्गत खदखद वाढत असताना निवडणुकांमध्ये परवडणारे नसल्याने राज ठाकरे यांचा दौरा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्षात मोठे प्रवेश सोहळे होत असले तरी मनसेतून देखील अन्य पक्षांमध्ये प्रवेशाच्या तयारीत अनेक जण असल्याचे बोलले जात आहे. या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या ठाकरे यांच्या दौऱ्यात काही महत्त्वाचे निर्णय होतील, अशी अपेक्षा मनसैनिकांकडून व्यक्त होत आहे. १६ जुलैला श्री. ठाकरे नाशिकमध्ये दाखल होतील. १७ तारखेला दिवसभर बैठका होतील. १८ तारखेला सायंकाळी ते मुंबईला परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(raj thackeray visit to nashik from 16th to 18th july political news)

Raj-Thackeray
मुंबई विद्यापीठ ‘बीए’च्या अभ्यासक्रमात ‘दगड आणि माती’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.