Nashik News : हिरव्यागार जंगलात बागडू लागले हरणे! राजापूर-ममदापूरला रिमझिमनंतर जंगल फुलले कळपांनी

A herd of deer grazing happily on the green meadows.
A herd of deer grazing happily on the green meadows. esakal
Updated on

Nashik News : राजापूर-ममदापूरचे जंगल काळवीट, हरणांचे माहेरघर असून आता तर हरणांची संख्या वाढली आहे.

सध्या जंगल रिमझिम पावसावर अल्प प्रमाणात का होईना फुलले असून यामुळे हिरव्यागार जंगलात स्वच्छंदपणे हरणे बागडू लागली आहेत. हे कळप पाहण्यासाठी आता हौशी पर्यटक जंगलाकडे फिरकू लागले आहेत. (Rajapur Mamdapur forest deer numbers increased nashik news)

राजापूर ममदापूर परिसरात वनविभागाने ५ हजार ४९५ हेक्टरवर राखीव वन संवर्धन क्षेत्र राखीव प्रकल्प साकारला आहे. हरिण काळवीट यांची सहा ते सात हजार संख्या असून काळवीट, तरस, लांडगा, ससे, कोल्हे, खोकड, रानडुक्कर, उदमांजर, रानमांजर, सायाळ, मोर व इतर पशू पक्षी वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी पाहण्यासाठी मिळत आहेत.

वनविभागाने या वनहद्दीत संवर्धनासाठी विविध योजना हाती घेतल्या असून त्यामुळे जंगल बदलत आहे. विविध सुविधा देखील उपलब्ध होत आहे. अर्थात हा भाग दुष्काळी व अवर्षणप्रवण असल्याने उन्हाळ्यात पाणी व अन्नाची टंचाईने हरणांचे हाल होतेच. उन्हाळ्यातील दाहकता सहन केलेल्या हरणांना या भागात जोरदार पावसामुळे मोठा दिलासा मिळतो.

मात्र, यंदा पावसाळा सुरु होऊन दीड महिना झाला, पण जोरदार पाऊस नसल्याने जंगलात मोठे जलस्रोत भरलेले नाहीत. अल्प पावसावर ठिकठिकाणी बंधारे, खड्डे पाण्याने भरली आहेत. पावसाने मात्र झालेली वृक्षलागवडही हिरवा शालू परिधान करून नटली आहे. जंगलातील डोंगरदऱ्यांत सर्वत्र हिरवळीने वेगळेच सौंदर्य निर्माण करून दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A herd of deer grazing happily on the green meadows.
Saptashrungi Devi Gad : इर्शाळवाडीच्या घटनेने सप्तशृंगगडावर चिंतेचे वातावरण; धोकेदायक भागाबाबत नागरिक भयभीत

त्यामुळे हरणांचे कळप मनसोक्तपणे झाडाझुडपांत बागडताना दिसत आहेत. रिमझिम पावसावर नाले, ओहोळ खळाळून वाहताना व बंधारेही भरल्याने हरणांच्या अन्न- पाण्याची चिंता मिटली आहे. राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रेंडाळे, कोळगाव, राहडीसह परिसरात हिरवळीवर हरिण काळवीट बागडू लागले असून मोर नाचू गाऊ लागले आहे.

सुरक्षेची जवाबदारी वाढली

पावसाळ्यात हरणे मनसोक्त फिरत असल्याने त्यांच्या जिवाला धोकाही असतो. यापूर्वी २००९ मध्ये व त्यानंतर २०१७ मध्ये जंगल फुलले म्हणून बिनधास्त भटकणाऱ्या हरणांची मालेगावच्या शिकाऱ्यांनी शिकार केली होती. या दोन्हीवेळी ग्रामस्थांनी शिकाऱ्यांना पकडून दिले म्हणून ही घटना उघड झाली होती.

अशा घटना अधूनमधून होत असल्याच्या चर्चाही रंगतात. त्यामुळे आता हरणे बागडू लागल्याने काही घटना घडू नये यासाठी वनविभागाने सतर्क होण्याची गरज असून हरणासह वन्यजीवांच्या सुरक्षेची जवाबदारी वाढली आहे. यामुळे या भागात नियमितपणे रात्रीची पेट्रोलिंग करण्याची मागणी होत आहे.

राजापूर परिसरातील वनक्षेत्रांतर्गत पावसाळा सुरू होताच प्रत्येकवर्षी वृक्षांची लागवड केली जाते. मागील १०-१५ वर्षात लाखोंच्या संख्येने जंगलात वृक्षलागवड करूनही पाणी व मुरमाड क्षेत्र असल्याने तसेच संवर्धनाचे प्रयत्न होत नसल्याने लागवड अयशस्वीच होत आहे. लागवड झालेल्यापैकी फक्त १५ ते २० टक्केच झाडे अस्तित्वात आहेत.

A herd of deer grazing happily on the green meadows.
Sakal Exclusive : रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! जनरल डब्यातील प्रवाशांना मिळणार 'इतक्या' किंमतीत जेवण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.