Rajerghujibaba Yatra : येवल्याच्या संस्थापकाची यात्रा सुरू! गुरूवारी छबिना मिरवणूक

On the occasion of Rajerghujibaba Yatra, mask and Ganga water procession started here on Tuesday
On the occasion of Rajerghujibaba Yatra, mask and Ganga water procession started here on Tuesdayesakal
Updated on

Rajerghujibaba Yatra : गावाच्या संस्थापकांची साजरी होणारी यात्रा अन् त्यांचे पुरातन मंदिर असलेले शहर म्हणून येवल्याची ओळख राज्यभर आहे.

मंगळवारी राजेरघुजीबाबा यात्रा उत्सवास सुरवात झाली असून सकाळी पालखी व कावडींची सवाद्य मिरवणूक शहरातील पाटीलगढी ते गंगादरवाजा येथून काढण्यात येऊन कावडीधारकांनी कोपरगाव येथून गोदावरीच्या आणलेल्या गंगाजलाचा रघुजीबाबांना अभिषेक करण्यात आला. (Rajerghujibaba Yatra of founder of Yeola begins Chhabina procession on Thursday nashik news)

सोळाव्या शतकात येवलेवाडी या गावाची स्थापना रघुजीबाबा नाईक यांनी केली आहे. चारशे वर्षाचा इतिहास लाभलेल्या या यात्रेचे आजही भव्य आयोजन होऊन त्यांना अभिवादन करण्यात येते. गुरुवारपर्यंत ही यात्रा असेल.

सोळाव्या शतकात रघुजीबाबा पाटलांनी पाटोद्याची पाटिलकी विकत घेऊन, औरंगाबाद, नाशिक व अहमदनगर या व्यापारी नगरांना जोडणारे ठिकाण असल्याने येवलवाडी येथे स्थलांतर केले. रघुजीबाबांनी या गावाच्या विकासासाठी विणकाम, जरीकाम व्यवसाय भरभराटीला आलेल्या पैठण, अहमदाबाद व हैद्राबाद येथून विणकरांना निमंत्रण देऊन येवलवाडीत आणले.

सर्व जाती-धर्माच्या लोकांना आश्रय, जागा उपलब्ध करून दिली. रघुजीबाबांनी मुस्लिमांसाठी मशीद उभारली. आजही पाटील मशीद म्हणून ही मशीद ओळखली जाते. शहराच्या चारही दिशेला चार दरवाजे उभारले गंगादरवाजा, नागडदरवाजा, अनकईदरवाजा, पाटोदादरवाजा या नावाने आजही ते ओळखले जातात.

रघुजीबाबा शहराचा कारभार जेथून चालवत ते पाटलांचे वस्तीस्थान गढी आजही ३५० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत आहे. शहराच्या मध्यवस्तीतील पवित्र समाधी मंदिरात दरवर्षी भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येतात.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

On the occasion of Rajerghujibaba Yatra, mask and Ganga water procession started here on Tuesday
Ramzan Eid : मुस्लिम बांधवांकडून घरोघरी, मशिदीमध्ये नमाजपठण; ‘शब- ए-कद्र’ उत्साहात

राजेरघुजीबाबा यात्रोत्सवाला आज सुरवात झाली असून मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास पालखी व कावडींची सवाद्य मिरवणूक शहरातील पाटीलगढी ते गंगादरवाजा येथून काढण्यात आली. शहरातील विविध भागातून ही मिरवणूक रघुजीबाबा मंदिरात पोचली.

कावडीधारकांनी कोपरगाव येथून गोदावरीच्या आणलेल्या गंगाजलाचा रघुजीबाबांना अभिषेक करण्यात आला. सुमारे अडीचशेच्या वर लहान मुले तरुण वृध्द कावडीधारक, भगवे टी-शर्ट परिधान करून कावडी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

संपूर्ण शहरातून कावडीची मिरवणूक झाल्यावर रघुजीबाबांच्या समाधीस्थळावर जलाभिषेक करण्यात आला. कावडीधारक व उपस्थित शहरवासियांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रघुजी बाबांच्या वंशज असलेल्या शिंदे कुटुंबातील सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शहरातील पाटलांच्या गढीवरील रघुजीबाबा यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या घरामध्ये रघुजीबाबाचा मुखवटा आहे. अक्षय तृतीयेच्या आधी येणाऱ्या मंगळवारी म्हणजे आज सकाळी त्याची पूजा विधीवत करून पालखीतून शहरातून मिरवणुक काढण्यात आली.

तत्पूर्वी सोमवारी रात्री येथील रघुजीबाबाच्या गढीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्रित येऊन खांद्यावर कावडी घेऊन कोपरगावहून पायी गंगेचे पाणी आणले. पालखीमागे पायी आलेल्या कावडीधारकांचीही मिरवणूक असते.

दीड किलोची चांदीची गदा

यात्रेनिमित्त बुधवारी पारंपारिक कुस्ती दंगल महोत्सवाचे आयोजन करण्यात आली आहे. या कुस्तीतील सर्वप्रथम मानाचे बक्षीस दीड किलो चांदीची गदा असल्याचे संयोजकांनी सांगितले तसेच बुधवारी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवारी सांयकाळी रघुजीबाबांचा मुखवटाची छबी गोंडा पालखी पुन्हा गढीवर नेण्यात येणार आहे.

On the occasion of Rajerghujibaba Yatra, mask and Ganga water procession started here on Tuesday
Bhairavanath Maharaj Yatraotsav : बोल भैरोबा की जय..! चांदोरीस रथोत्सव, हजारांवर भाविकांची उपस्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.